आपला जिल्हा

संजीवनी कॉलेजच्या आठ अभियंत्यांची व्हिजन व्हेव्ज कंपनीत नोकरीसाठी निवड

संजीवनी कॉलेजच्या आठ अभियंत्यांची व्हिजन व्हेव्ज कंपनीत नोकरीसाठी निवड

 सुरूवातीलाच वार्षिक  सहा लाख रुपयाचे पॅकेज मिळणार

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि ९ मे २०२५: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या  मिळाव्यात व पालकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात या हेतुने विविध कंपन्यांशी  संपर्क साधुन कंपन्यांच्या गरजेप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित  करतो. अशाच प्रयत्नातुन आर्टिफिशियल इंटिलिजंस (एआय) व मशीन लर्निंग (एमएल) क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्हिजन व्हेव्ज कंपनीचा  कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या ड्राईव्ह मध्ये या कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील  आठ अभियंत्यांची वार्षिक  सहा लाख पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी  माहिती महाविद्यालयाच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

         या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये व्हिजन व्हेव्ज कंपनीने अभिषेक  प्रभाकर आभाळे, तौफिक अन्सार अत्तार, वैभव विक्रम भोरकडे, अभिषेक  राजेंद्र गायकवाड, आदिती लक्ष्मण बैरागी, प्रशांत अशोक  पाचोरे, क्षितिजा विनायक ठाकुर व ऋषिकेश  मधुकर राऊत यांची नोकरीसाठी निवड केली आहे.

जाहिरात

या सर्व विद्यार्थ्यांचे संजीवनीचे अघ्यक्ष  नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी  अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

    मी कोपरगांव येथिल सर्वसामान्य कुटूंबातील मुलगी आहे. मी अगोदर संजीवनी पॉलीटेक्निकमधुन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डीप्लोमा केला. डीप्लोमाला असताना संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अनेक मुलांना व मुलींना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळायच्या हे पाहत असे. त्यामुळे मी येथेच डीग्री पुर्ण करण्याचा निश्चय  केला आणि मला डीप्लोमाला चांगले मार्कस् असल्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश  मिळाला. अगदी दुसऱ्या  वर्षापासून   आमच्यासाठी  मुलाखतीचे तंत्र, तज्ञांची मार्गदर्शने , नामांकित कंपन्यांचे अभ्यास दौरे, आदी उपक्रम  राबविण्यात आले. कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्हच्या अगोदर आमच्याकडून मुलाखतीचा भरपुर सराव करून घेण्यात आला. सरावाच्या वेळेस जे प्रश्न  विचारण्यात आले होते, तेच बहुतांशी प्रश्न प्रत्यक्ष मुलाखतीत विचारण्यात आले. यात कंपनीने एआयएमएल, कोडींग, वेब डेव्हलपमेंट, इत्यांदीवर अधिक भर दिला. तसेच समुह कार्यपध्दतीवर कल जाणुन घेण्यासाठी समुहामध्ये कोणते प्रोजेक्ट केले व त्याची फल निष्पत्ती  काय मिळाली, हे विचारले. या सर्व प्रश्नांचा  माझा सराव झाला होता, त्यामुळे मुलाखत मी सहजपणे देवु शकले आणि माझी नोकरीसाठी निवड झाली. संजीवनीमुळे माझे व माझ्या पालकांचे नोकरीचे स्वप्न पुर्ण झाले.-नवोदित अभियंता आदिती बैरागी.  
 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे