आपला जिल्हा

नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज शिरभाते

नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज शिरभाते
नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज शिरभाते
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० जानेवारी २०२६नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन (NFWA), पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या महाराष्ट्रातील कार्यविस्ताराचा एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्षपदी डॉ. मनोज प्रभाकर शिरभाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती अधिकृतपणे जाहीर केली आहे.

जाहिरात
डॉ. मनोज शिरभाते हे अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, संगमनेर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असून त्यांना फार्मसी शिक्षण, औषध व्यवसाय, संशोधन व संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. फार्मसी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सकारात्मक व प्रभावी भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

जाहिरात

त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील फार्मासिस्ट, औषध विक्रेते, विद्यार्थी व औषध व्यवसायाशी संबंधित घटकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील, तसेच व्यावसायिक हक्क, प्रशिक्षण, रोजगार संधी व फार्मसी सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी संघटनेमार्फत ठोस कार्य केले जाईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल, उपाध्यक्ष डॉ. अमोल शहा, डॉ. योगेश बाफना, डॉ. संपत नवले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संघटनेचा विस्तार केला आहे.

या नियुक्तीबद्दल NFWA चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य तसेच फार्मसी क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. मनोज शिरभाते यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. मनोज शिरभाते यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे मा. महसूल मंत्री व अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात साहेब, मा. आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब, संस्थेच्या विश्वस्थ सौ. शरयू देशमुख, संस्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए.बी. शिंदे, डायरेक्टरेट अकेडमीक डॉ. जी.बी. गुरव यांनी अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे