आपला जिल्हा

गोदावरी बायोरिफायनरीज साकरवाडी येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

गोदावरी बायोरिफायनरीज साकरवाडी येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

 

 

गोदावरी बायोरिफायनरीज साकरवाडी येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस उत्साहात साजरा; विविध उपक्रमांचे आयोजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ मार्च २०२६: ‘सुरक्षा प्रथम’ या ब्रीदवाक्यानुसार गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी येथे राष्ट्रीय सुरक्षा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कारखान्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचा जागर केला.कार्यक्रमाची सुरुवात कारखान्याचे डायरेक्टर सुहास गोडगे यांच्या हस्ते सुरक्षा ध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन करणे ही केवळ जबाबदारी नसून ते कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.

जाहिरात

मुख्य तांत्रिकी अधिकारी प्रविण विभुते यांनी कारखान्यात काम करत असताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षिततेचे तांत्रिक महत्त्व सर्वांना पटवून दिले. अपघातामुक्त कार्यसंस्कृती जोपासण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कामगारांना सुरक्षितता व स्वच्छतेची सामूहिक शपथ दिली.

जाहिरात

राष्ट्रीय सुरक्षा दिवसानिमित्त कारखान्यात संपूर्ण आठवडा ‘सुरक्षा सप्ताह’ म्हणून साजरा केला जात आहे. या सप्ताहामध्ये कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, कारखान्यात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांचे (Safety Equipment) एक विशेष प्रदर्शनही भरविण्यात आले असून, ते सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

जाहिरात

या कार्यक्रमाला डायरेक्टर सुहास गोडगे, मुख्य तांत्रिकी अधिकारी प्रविण विभुते, जनरल मॅनेजर डॉ. गणेश गंडी, सुरक्षा अधिकारी श्रीधर धमाळ, संदिप रक्ताटॆ यांच्यासह कारखान्यातील सर्व विभागांचे अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरक्षा विभागाने विशेष परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे