आपला जिल्हा

इंजिनीयर इंद्रभान चौधरी यांना कोहिनूररत्न पुरस्कार

इंजिनीयर इंद्रभान चौधरी यांना कोहिनूररत्न पुरस्कार
इंजिनीयर इंद्रभान चौधरी यांना कोहिनूररत्न पुरस्कार
संगमनेर विजय कापसे दि १५ मार्च २०२६लोकनेते

जाहिरात

बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी व कनोली येथील बालाजी दूध संस्थेचे चेअरमन इंजिनियर इंद्रभान मारुती चौधरी यांना गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार 2026 मिळाला असून त्यांना एकविरा फाउंडेशनच्या कार्यक्रमांमध्ये गौरवण्यात आले.

जाहिरात
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या कार्यक्रमांमध्ये कोहिनूर रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल इंद्रभान चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, ॲड नानासाहेब शिंदे, सौ.रचनाताई मालपाणी, ॲड.ज्योतीताई मालपाणी, आयुष चौधरी, ओम चौधरी यांसह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

इंद्रभान चौधरी यांनी आपल्या सिव्हिल व्यवसायाबरोबरच शेती व दूध व्यवसाय मधून इतरांसाठी आदर्श काम केले आहे. संगमनेर तालुक्यामधील विविध मंदिरांची अत्यंत सुंदर बांधणी त्यांनी केली असून त्यांना यापूर्वी आदर्श इंजिनियर म्हणून सुद्धा गौरविण्यात आले आहे. युवकांमध्ये स्वयंरोजगारासाठी जाणीव जागृती निर्माण करून देण्याबरोबरच नवीन स्थापत्य कला अत्यंत दिमाखदार पद्धतीने त्यांनी राबवली आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन नाशिक येथील गुरु आराध्या फाउंडेशन ने यावर्षीचा कोहिनूरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

जाहिरात

या पुरस्काराबद्दल बोलताना इंद्रभान चौधरी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा विविध क्षेत्रांमध्ये मोठी संधी आहे. मोठे स्वप्न पाहिली की माणूस मोठा होतो. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा चांगल्या स्वप्नांचा पाठला करण्यामध्ये आपण वेळ घालवावा. कृषी क्षेत्रामधूनही करिअरच्या अनेक संधी असून सिव्हिल विभागांमध्ये दररोज नवनवीन आव्हाने निर्माण होत आहे एआय च्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण होत असून त्याचा फायदा नवीन अभियंत्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

इंद्रभान चौधरी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, सिताराम पाटील वर्पे, मीनानाथ वर्पे, सतीश वर्पे, शिवाजी जगताप, लहानु वर्पे यांच्यासह कनोली ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे