अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न; देशभरातून ३०० उद्योजकांची उपस्थिती

व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेतील बदलते प्रवाह यावर चर्चा

संगमनेर विजय कापसे दि १५ मार्च २०२६– अमेरिका इराण युद्धसह उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्य,व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेतील बदलत्या प्रवाहबद्दल अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयांमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली असून यामध्ये देशभरातील विविध तज्ञांनी उच्च शिक्षण, शाश्वत विकास आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्य याबाबत मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील 300 हून अधिक उद्योग तज्ञ आणि निवेदित उद्योजक यांनी सहभाग घेतला.

अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या क्वालिटी इम्प्रूमेंट प्रोग्रॅम अंतर्गत दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ.एन.एम.नायर, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटचे डॉ.चंद्रहास चव्हाण, प्रा.डॉ.देविदास गोल्हार,मकरंद सावरकर, सुधीर मतेती, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी.धुमाळ, डॉ.जे.बी.गुरव, एमबीए चे संचालक डॉ.बी.एम.लोंढे, डॉ.मनोज शिरभाते, डॉ.मच्छिंद्र चव्हाण आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

या राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ.चंद्रहास चव्हाण म्हणाले की, तंत्रज्ञान नवसंकल्पना आणि उद्योजकता यांचा संगम साधून विविध महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी नवे उद्योजक घडवण्याचे महत्त्वाचे असून त्यांना नवीन तंत्रज्ञान समजावून सांगितले पाहिजे. डॉ.देविदास गोल्हार म्हणाले की ग्रामीण भागामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने अत्यंत गुणवत्तापूर्ण परिसर निर्माण केला आहे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी असलेला समन्वय हा विद्यार्थ्यांच्या नोकरी आणि स्वयंरोजगारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. नवनवीन तंत्रज्ञानाबरोबर राहणे ही काळाची गरज बनली असल्याचे ते म्हणाले.

तर डॉ.बी.एम.लोंढे म्हणाले की, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्य आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे कारण दररोज जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवाह बदलत असून त्यानुसार आपले व्यवस्थापनकौशल्य प्रभावी ठरले पाहिजे. याकरता विद्यार्थ्यांनी अत्यंत सगज असणे गरजेचे आहे. यावेळी सुधीर मतेती, डॉ.वाय.व्ही.राव, डॉ.एन.एम.नायर, मकरंद सावरकर, डॉ.देविदास गोल्हार, यांनीही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रावर मार्गदर्शन केले.
या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून 67 संशोधन लेख मिळाले असून या संशोधन लेखांचे परीक्षण करण्यासाठी नाशिक येथील डॉ.योगेश गायकवाड व पुणे येथील डॉ.मानसी भाटे यांचे विशेष सहकार्य लाभले या लेखांमधून रोहिणी विघ्ने हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व 5000 रुपये रोख तर शुभम बोरकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व 3000 रुपये रोख देऊन गौरविण्यात आले. या राष्ट्रीय परिषदेमुळे संशोधन संस्कृती,तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत विकास या विषयावर व्यापक चर्चा होऊन विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली असल्याचे सौ.शरयूताई देशमुख यांनी म्हटले आहे.
या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे,सौ. शरयूताई देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्रा.व्ही.बी.धुमाळ, डॉ.जे.बी.गुरव, एम.बी.ए.चे संचालक डॉ.बी.एम.लोंढे यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्सच्या आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.



