आपला जिल्हा

भागचंद  ठोळे विद्यालयातच विद्यार्थ्यांना डोमेसाईल प्रमाणपत्र   वितरण 

भागचंद  ठोळे विद्यालयातच विद्यार्थ्यांना डोमेसाईल प्रमाणपत्र   वितरण 
भागचंद  ठोळे विद्यालयातच विद्यार्थ्यांना डोमेसाईल प्रमाणपत्र   वितरण 

Kopargaon vijay kapse दि २६ मार्च २०२६- शिंदे सेतू कार्यालय कोपरगाव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा अंतर्गत भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे विद्यार्थ्यांना डोमेसाईल रहिवासी दाखले वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जाहिरात

  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुक्याचे नायब तहसीलदार  चंद्रकांत कुलथे  व शिक्षणाधिकारी  शबाना शेख उपस्थित होते. तसेच स्कूल कमिटीचे सहसचिव सचिन अजमेरे , सदस्य डॉक्टर .अमोल अजमेरे, राजेश ठोळे व पालक यांची उपस्थिती लाभली.

      यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करून त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी चंद्रकांत कुलथे यांनी शाळेने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच , शबाना शेख यांनी संस्थेने प्रशासनावर विश्वास दाखवून संस्थेचे व प्रशासनाचे एकत्रितपणे विचार होऊन या योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळाला . प्रमाणपत्र सहजरित्या उपलब्ध झाल्याने जबाबदारीने अभ्यास करून शाळेचे ,गावाचे व तालुक्याचे नाव लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न केले असे सांगितले. संस्थेचे सदस्य राजेश ठोळे  यांनी हा स्तुत्य पर उपक्रम असून यांनी शासन आपल्या दारी या योजनेप्रमाणे विद्यार्थ्यांना कॉलेज ऍडमिशन साठी लागणारे प्रमाणपत्राचे महत्त्व सांगितले. डॉ. अमोल अजमेरे यांनी पूर्वीच्या काळी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा त्रास  व सध्या डिजिटल पद्धतीने मिळणारे दाखले यातील फरक समजावून सांगितला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद निमोणकर व उपमुख्याध्यापिका  वर्षा आगरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका  अर्चना वाणी यांनी करून उपस्थित असलेल्या मान्यवरांचे, तसेच उपस्थित पालक,विद्यार्थी व सहकार्य लाभलेल्या शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले ‌

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे