आपला जिल्हा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय दलित पॅंथर कडून ॲम्बुलन्सचे लोकार्पण

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय दलित पॅंथर कडून ॲम्बुलन्सचे लोकार्पण

दलित पॅंथर कडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जगाला मार्गदर्शक – मा.मंत्री थोरात

जाहिरात

Sangmner vijay kapse दि १५  एप्रिल २०२६भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संतपरंपरेचा समृद्ध वारसा सांगणारी राज्यघटना देशाला दिली. राज्यघटना व लोकशाही ही आपल्या देशाचा आत्मा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा विचार हा जगाला मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून राष्ट्रीय दलित पॅंथर आणि राजू खरात मित्र मंडळ यांच्या वतीने ॲम्बुलन्स सेवेचे लोकार्पण केले.

जाहिरात

संगमनेर हायटेक बस स्थानक येथे राष्ट्रीय दलित पॅंथरच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, राष्ट्रीय दलित पॅंथरचे राजू खरात, विश्वासराव मुर्तडक, सिताराम राऊत, प्रवीण गायकवाड, रवी गिरी, ऋतिक राऊत, जीवन पांचारिया यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय दलित पॅंथर व राजूभाऊ खरात मित्र मंडळाच्या वतीने ॲम्बुलन्स सेवेचे लोकार्पण करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समितीची राज्यघटना दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर या दोन व्यक्तिमत्त्वांचा मोठा आदर्श असून इतिहासकार अर्थतज्ञ समाज तज्ञ असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. गरीब शोषितांच्या साठी लढा दिला. त्यांनी दिलेली राज्यघटना ही अत्यंत महत्त्वाची असून राज्यघटना आणि लोकशाही जपण्याची जबाबदारी सर्व युवकांची आहे. या राष्ट्रपुरुषांची विचार सर्वांनी आचरणात आणले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारला जाणार आहे.

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, राजूभाऊ खरात मित्र मंडळाने गोरगरिबांच्या सेवा करता दिलेली ॲम्बुलन्स सेवेमुळे गरीब नागरिकांना वैद्यकीय सेवा तात्काळ मिळण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

तर राजू खरात म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात गोरगरीब माणसांच्या विकासासाठी काम केले जात आहे. काही लोक भुलथापा देतील मात्र कोणीही या भूलथापांना बळी न पडता सर्वांनी सर्वांना सोबत पुढे घेऊन जाणारे लोक नेतृत्व थोरात यांच्याच पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गायकवाड यांनी केले तर रवी गिरी यांनी आभार मानले. यावेळी दलित पॅंथरच्या विविध कार्यकर्त्यांनी अत्यंत आनंदात व मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे