आपला जिल्हा

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा रस्ता सुरक्षा उपक्रम

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा रस्ता सुरक्षा उपक्रम

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा रस्ता सुरक्षा उपक्रम

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २२ मे २०२६ : लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने रस्ता सुरक्षा उपक्रमाअंतर्गत शहरातील धोकादायक व अपघातप्रवण ठिकाणी कॉन्व्हेक्स मिरर बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ काल डिस्ट्रिक गावर्नल PMJF ला राजेश अग्रवाल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला.

जाहिरात

या उपक्रमाअंतर्गत एकूण 15 मिरर कोपरगाव शहरातील विविध वळणांवर, अरुंद रस्त्यांवर तसेच ज्या ठिकाणी समोरून येणारी वाहने दिसत नाहीत अशा ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.

जाहिरात

या मिररमुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने लांबूनच दिसतील, त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होईल. विशेषतः शाळा परिसर, चौक, वळणाचे रस्ते आणि कमी दृश्यमानतेच्या भागांमध्ये हा उपक्रम अधिक उपयुक्त ठरणार आहे या उपक्रमामुळे कोपरगाव शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

जाहिरात

या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष ला अक्षय गिरमे , सचिव ला संदीप राशीणकर, खजिनदार ला अक्षय बोरा, लिओ अध्यक्ष धीरज कराचीवाला, लिओ सचिव मानस नांगरे, लिओ खजिनदार संयम फुलफगार उपस्थित होते.
तसेच लायन सदस्यांमध्ये ला ZC डॉ. संजय उबाळे, ला MJF सुधीर डागा, ला सत्यान मुंदडा, ला संदीप रोहमारे, ला विक्रांत सोमोसे, ला सचिन भडकवाडे, ला दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारा क्लब असून समाजहितासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे