आपला जिल्हा

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर विद्यालयात नवप्रवेशित – विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर विद्यालयात नवप्रवेशित – विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर विद्यालयात नवप्रवेशित – विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ जुन २०२६कोपरगाव येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर शाळेत नवीन विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर विविध रंगबेरंगी फुले, फुगे व रांगोळ्या काढून आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. सेल्फी पॉइन्ट विद्यार्थिनी व पालकांचे आकर्षण केंद्र बनले होते. विद्यालयाच्या स्थानिक शालेय समितीचे सदस्य स्वप्नजा  वाबळे , स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य  वसंतराव कपिले, सुशीलकुमार अरोरा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युसुफ  रंगरेज, शिक्षक पालक संघाच्या सहसचिव अर्चना औताडे, प्राचार्या अनिता धनक, उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के, पर्यवेक्षिका सुनीता पवार, पर्यवेक्षक
प्रभाकर आभाळे, तसेच मोठ्या संख्येने पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात

मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थिनीचे गुलाबपुष्प, पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनीनी भरपूर अभ्यास करावा त्याचबरोबर शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास करण्यासाठी प्रयत्न करावा, विविध मैदानी खेळ खेळून शारीरिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवण्याचे आवाहन स्वप्नजा  वाबळे यांनी केले. वसंतराव कपिले यांनी विद्यार्थिनींना चांगल्या प्रकारे गुणवत्ता प्राप्त करून विद्यालयाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले.

जाहिरात

प्रास्ताविक करताना प्राचार्या धनक म्हणाल्या की, शाळेतील पहिला दिवस दडपणमुक्त व आनंददायी असावा, या उद्देशाने विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी आनंददायी शिक्षण घेऊन यशाची उत्तुंग भरारी घेऊन विद्यालयाचे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करावे. विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षातील प्रगतीचा आलेख त्यांनी विद्यार्थिनीसमोर सादर केला . सुत्रसंचलन ललित जगताप यांनी केले, भाऊसाहेब बडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले,

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे