मेहता विद्यालयाची सेजल योगेश बोरसे गणित व संस्कृत मध्ये राज्यात प्रथम

मेहता विद्यालयाची सेजल योगेश बोरसे गणित व संस्कृत मध्ये राज्यात प्रथम
मेहता विद्यालयाची सेजल योगेश बोरसे गणित व संस्कृत मध्ये राज्यात प्रथम

Kopargaon vijay kapse दि १६ जुन २०२६–कोपरगाव शहरातील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एस. एस. सी. परीक्षेत उज्वल यशाची परंपरा याहीवर्षी कायम राखली असून ९८ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली सेजल बोरसे कोपरगाव तालुक्यात दुसरी आली आहे. तर गणित व संस्कृत विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून सेजल बोरसे गणित व संस्कृत विषयात राज्यात पहिली आली असल्याची माहीती प्राचार्या अनिता धनक यांनी दिली.

मेहता कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल ९३.५४ टक्के लागला आहे. अनुष्का धनंजय पऱ्हे ९७.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकाविला असून, समीक्षा सिताराम भांडकोळी या विद्यार्थिनीने ९५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळविला आहे.
गुणवत्तेनुसार विद्यालयाच्या १३ विद्यार्थिनींनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. 64 विद्यार्थिनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून, ८६ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत, १०३ विद्यार्थिनी तृतीय श्रेणीत, ३७ विद्यार्थिनिंनी उत्तीर्ण श्रेणीमध्ये यश प्राप्त केले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आ. रोहीत पवार, माजी विभागीय अध्यक्ष आशुतोष काळे तसेच तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे सर्व जनरल बॉडी सदस्य, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, उपविभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, विभागीय गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, अध्यक्ष व सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी, स्थानिक सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, विद्यालयाच्या प्राचार्या अनिता धनक उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के , पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे, सुनीता पवार, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले.





