करंजी गावचे ग्रामदैवत चौरंगीनाथ महाराज यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
करंजी गावचे ग्रामदैवत चौरंगीनाथ महाराज यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ
एकमताने यात्रा कमिटी जाहीर

कोपरगाव विजय कापसे दि ९ एप्रिल २०२४– कोपरगाव तालुक्यातील करंजी बुद्रुक पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांचे जागृत देवस्थान असलेल्या श्री चौरंगीनाथ महाराजांच्या साडेतीन मुहूर्तापैकी पवित्र अशा अक्षय तृतीयेपासून सुरू होणाऱ्या यात्रेचा परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या शुभ दिनी गावातील जेष्ठ श्रेष्ठ सर्व धर्मियांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष भिंगारे, सरपंच रवींद्र आगवन, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक संजय आगवन, अमृत संजीवनीचे संचालक देविदास भिंगारे, माजी सभापती नवनाथ आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, दादाभाऊ भिंगारे, वाल्मीक भिंगारे, अनिल डोखे, गोरख भिंगारे, अंबादास आगवन, अरुण भिंगारे, आप्पासाहेब आगवन,डॉ सुनील देसाई, सांडूभाई पठाण, दगुनाना वाघ, गणेश भिंगारे, अजय भिंगारे, विकास शिंदे आदींच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी चंदूनाना भिंगारे तर उपाध्यक्षपदी हर्षल आगवन यांची एकमताने निवड करण्यात आली.

तसेच या यात्रा कमिटीच्या सचिव पदी बाबासाहेब आगवन,सहसचिव पदी सतीश फापाळे, प्रसिद्ध प्रमुख पदी आकाश भिंगारे, सह-प्रसिद्धी प्रमुख पदी महेंद्र शिंदे, खजिनदारपदी योगेश भिंगारे, सह-खजिनदार पदी प्रसाद आगवन, स्वागत कमिटी पदी गोकुळ जाधव, रवी येवले, ऋषिकेश चरमळ, नियोजन कमिटी मध्ये योगेश शिंदे, गणेश भिंगारे, गोविंद आगवन, अण्णा भिंगारे,राजू शेख, आशरफ इनामदार, अल्ताफ शेख, रज्जाक शेख, लक्ष्मण भिंगारे, कृष्णा भिंगारे, गणेश बोठे, भीमराज कासार, जावेद पठाण, दादाभाऊ जोर्वेकर, सुनिल जाधव, सचिन भिंगारे, दिगंबर जाधव, दत्तात्रय आगवन, बाबासो आगवन, रोहित शेळके, नंदकिशोर आगवन, भाऊसाहेब शहाणे, सोमनाथ काकडे, विजय आहेर आदींची यात्रा कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली.