शहर पोलिस कोपरगाव

मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात आलेल्या १६ लाखाच्या गुटख्यासह दोन आरोपीना शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात आलेल्या १६ लाखाच्या गुटख्यासह दोन आरोपीना शहर पोलिसांनी घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची मोठी कारवाई
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ एप्रिल २०२४बुधवार दि २४ एप्रिल रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणतांबा फाटा येथे दुपारी ३ वाजेच्या सुमारास स्थानीक गुन्हे शाखा अहमदनगर व कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी सापळा रचत तब्बल १६ लाख रुपयांचा गुटखा जप्त करत मोठी कारवाई केल्याने अवैद्य धंद्यावाल्याचे धाबे दणाणले आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे कार्यरत असलेले पोलीस नायक संतोष राजेंद्र खैरे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार दि २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता राजू उमराव भिल राहणार गवाडी,तालुका निवाली, जिल्हा बडवानी मध्यप्रदेश,  नितेश राजू भाबड राहणार अंबिकापुरी पाण्याच्या टाकी समोर इंदोर मध्य प्रदेश यांनी संगनमताने अभय गुप्ता राहणार छोटा बांगरदा रोड इंदोर मध्यप्रदेश यांच्याकडून ४ लाख ३५ हजार ६०० रुपये किमतीच्या १० विमल पान मसाला असलेली पोते, ४८ हजार ४०० रुपयेचे ५ वी-१ तंबाखूच्या गोण्या, ४ लाख ११ हजार ८४० रुपये किमतीच्या राजनिवास पान मसाला असलेल्या १० गोण्या, १ लाख ५ हजार ६०० रुपयांच्या झेड एल-०१ जाफरणी जर्दाच्या २ गोण्या असा महाराष्ट्र राज्यांमध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू ६ लाख रुपये किमतीच्या एमपी ४६ जी २३५७ या पिकप मधून कोपरगाव येथील योगेश कटाळे व घारगाव संगमनेर येथील किरण लामखेडे यांच्याकडे घेऊन जात असताना पुणतांबा फाटा कोपरगाव येथे वाहनांसह सुमारे १६ लाख १ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून यातील आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये २०२४ भांदवी कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे हे करत आहे.

जाहिरात
राजू उमराव भिल व मितेश राजू भाबड राहणार मध्यप्रदेश या आरोपीना कोपरगाव शहर पोलिसांनी वरील मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे तर उर्वरित तीन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध पोलिस घेत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे