काळे गट

न्यू इंग्लिश स्कूल देर्डेचांदवड  विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.८७% टक्के

 न्यू इंग्लिश स्कूल देर्डेचांदवड  विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.८७% टक्के

न्यू इंग्लिश स्कूल देर्डेचांदवड  विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.८७% टक्के

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ मे २०२४महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द झाला असून यात कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे  न्यू इंग्लिश स्कूल देर्डेचांदवड या विद्यालयाचा   निकाल ९४.८७% इतका लागला आहे.

जाहिरात

या निकालात प्रथम क्रमांक आदित्य दत्तात्रय सूर्यवंशी  ९०.६०% टक्के , द्वितीय क्रमांक तेजस दगडू सूर्यवंशी   ८४.६०% टक्के तर तृतीय क्रमांक प्रतीक्षा आनंदा खरात ८३.६० % टक्के यांनी मिळविला असून शाळेचे  ३९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्या पैकी विशेष प्राविण्यासह ७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ११ विद्यार्थी तर  उत्तीर्णश्रेणी मध्ये ६ विद्यार्थी असे एकूण ३७ विद्यार्थी यशस्वी झाले आहे.

जाहिरात

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे,सचिव  चैतालीताई काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, शालेय स्कूल कमेटीचे उपाध्यक्ष बाबुराव कोल्हे, शाळेचे  मुख्याध्यापक प्रकाश देशमुख तसेच शिक्षण प्रेमी नागरिक आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक रमेश हिंगे ,संजय खरनार  , पंढरीनाथ शिंदे  , सदाशिव कदम आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे