नायपर परीक्षेत कोपरगावच्या आर जे एस फार्मसीच्या साईश म्हस्केचे सुयश
नायपर परीक्षेत कोपरगावच्या आर जे एस फार्मसीच्या साईश म्हस्केचे सुयश
कोपरगाव विजय कापसे दि २९ जून २०२४: कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज च्या शेवटच्या वर्षाचा साईश म्हस्के याने औषध निर्माण शास्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या NIPER – २०२४ या परीक्षेत m.tech medical device या विभागात ७५३ रँक मिळवून सुयश प्राप्त केले.हि प्रवेश परीक्षेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीस्टिकल एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद स्वायत्ता दर्जा असलेल्या संस्थेतर्फे घेतली जाते.
NIPER ( नायपर ) हि औषधी निर्माणशास्र शाखेची देशातील अग्रगण्य संस्था असून भारत सरकारद्वारे इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स हा दर्जा प्राप्त झालेलें आहे. देशात NIPER ( नायपर ) च्या एकूण सात संस्था आहे. त्या मोहाली, हैद्राबाद, अहमदाबाद, को
साईशच्या यशामध्ये कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांचा खूप मोठा वाटा आहे. प्राध्यापकांनी साईशला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्याला हे यश प्राप्त झाले.असे त्याने आपल्या मनोगतातून व्यक्त केले. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिकांचे तसेच परीक्षा अभ्यासाचे सुनियोजन यामुळे साईशला यश प्राप्त झाले.फार्मसीचे प्राचार्य डॉ.नितीन जैन यांनी सांगितले. उत्कृष्ट यश संपादन मिळवल्याबद्दल आर जे एस संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,विजय कडू,दीपक कोटमे आणि संस्थेच्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी यांनी त्याचे कौतुक केले.