एस जे एस हॉस्पिटल ग्रुप कोपरगाव

आरजेएस फार्मसीच्या ११ विद्यार्थ्यांना २.५० लाख पेक्षा जास्त पॅकेज असलेली नोकरी

आरजेएस फार्मसीच्या ११ विद्यार्थ्यांना २.५० लाख पेक्षा जास्त पॅकेज असलेली नोकरी
आरजेएस फार्मसीच्या ११ विद्यार्थ्यांना २.५० लाख पेक्षा जास्त पॅकेज असलेली नोकरी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ एप्रिल २०२५ :- कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील ११ विद्यार्थ्यांची मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या, सारिगम येथे गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागात निवड झाली. या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्चित होईल आणि कॉलेजच्या मानाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला.

यात ऋषिकेश कोल्हे, हर्षद पावले,वैभव धगे,मयूर पैठणकर, प्रशांत सिनगर, आदित्य गांगुले, प्रसाद सप्ते,विवेक मते,रोहित बद्रे,वैष्णवी पाटील,ऋतुजा इंगळे,या विद्यार्थ्यांची मॅक्लिओड्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीत निवड झाली.ही भारतातील एक अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनी आहे, गुजरात मधील सारिगम येथे आपले ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ चालवते. हे केंद्र संशोधन, विकास आणि उत्पादन क्षमतांचे संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे. जी गुणवत्तेच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादन विभागात निवडलेले विद्यार्थी त्यांच्या कौशल्यांचा विकास करतील आणि औद्योगिक क्षेत्रात अनुभव मिळवतील.

जाहिरात
संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, उद्योजक  विजय कडू , इंजिनिअर  दीपक कोटमे तसेच प्राचार्य डॉ.नितिन जैन, उपप्राचार्य उषा जैन , प्रा.डॉ.विजय जाधव, प्रा.डॉ.सचिन आगलावे, प्रा. करवीर आघाडे, प्रा.सुरज बेंद्रे, प्रा.दादासाहेब कावाडे व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा.रुद्रेश रत्नपारखे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कॉलेजने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट सुविधा, अनुभवी शिक्षकवर्ग आणि आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या यशात या सर्वांचा महत्त्वाचा हात आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास सेमिनार आणि औद्योगिक भेटींचे आयोजन नेहमी केले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना औद्योगिक ज्ञान मिळते आणि ते त्यांच्या करिअरची दिशा ठरविण्यास मदत होते. कॉलेजाच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक जीवन अधिक यशस्वी होते.

जाहिरात आत्मा
या निवडीमुळे कॉलेजच्या नावाला मान मिळाला आहे.आणि इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.विद्यार्थ्यांच्या यशामुळे कॉलेजाच्या गुणवत्तेचे आणि शिक्षणाच्या उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाईल.विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी कॉलेज प्रशासन कटिबद्ध आहे आणि भविष्यातही अशा यशस्वी गोष्टी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे