शहर पोलिस कोपरगाव
शहर पोलिस व वकील संघाच्या वतीने नवीन कायद्याची जनजागृती अभियान रॅली संपन्न
शहर पोलिस व वकील संघाच्या वतीने नवीन कायद्याची जनजागृती अभियान रॅली संपन्न
शहर पोलिस व वकील संघाच्या वतीने नवीन कायद्याची जनजागृती अभियान रॅली संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २ जुलै २०२४– भारत देशात सोमवार १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू झाले असून या कायद्यांची जनसामान्य नागरिकांपर्यंत जनजागृती व्हावी या उद्देशाने संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरू असून याच पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन व कोपरगाव तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात रॅली काढत नवीन कायद्याविषयी जनजागृती अभियान राबवण्यात आले.
यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, ॲड. येवले, ॲड. वहाडणे आदिसह शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, वकील संघाचे पदाधिकारी, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी वरीष्ठ पोलिसाच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वकिल संघाचे पदाधिकारी वकील यांनी हातात बदल झालेल्या कायद्याच्या जनजागृती माहितीचा फलक घेऊन तहसील कार्यालय पासून रॅलीला सुरुवात करत संपूर्ण शहरातून रॅली काढत शहर पोलीस स्टेशनमध्ये या रॅलीची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी बोलताना सांगितले की, भारत सरकारने भारतीय कायद्यात आमुलाग्र असा बदल करत १ जुलै २०२४ पासून भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा सहिता २०२३ व भारतीय साक्ष अभियान २०२३ हे नवीन कायदे अंमलात आणले असून हे नवीन कायदे सामान्यांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने शहर पोलीस व तालुका वकील संघाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती सुरू केली असून लवकरच शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्येष्ठ वकिलांच्या मदतीन या कायद्याचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी सेमिनार देखील आयोजित करण्यात येणार असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली या कायद्यानुसार सोमवार १ जुलै पासून कामकाज देखील सुरू करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले आहे.