नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू – डॉ जयश्रीताई थोरात; ८०५५९८७७७७ या नंबर वर मिस कॉल करा
नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू – डॉ जयश्रीताई थोरात; ८०५५९८७७७७ या नंबर वर मिस कॉल करा
जाहिरात
संगमनेर प्रतिनिधी दि ५ जुलै २०२४– विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिला असून 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी 8055987777 या नंबर वर नवीन मतदार नोंदणी करता मिस कॉल देऊन या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
जाहिरात
नवीन मतदार नोंदणी अभियान बाबत अधिक माहिती देताना डॉ. थोरात म्हणाल्या की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे .माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा मूलभूत अधिकार दिला. लोकशाही प्रक्रियेत मतदान हे अत्यंत महत्त्वाचे असून नवीन मतदारांना सहज आणि सुलभतेने नाव नोंदणी करता यावी याकरता वरील नंबर वर मिस कॉल देऊन आपले नाव नोंदता येणार आहे.जाहिरात
नवीन मतदारांनी लवकरात लवकर या अभियानात सहभागी व्हावा अत्यंत सोप्या पद्धतीने मतदार नोंदणी करता यावी याकरता 8055987777 या नंबर वर मिस कॉल करावा नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू झाली असून यासाठी एक फोटो, जन्मतारखेचा पुरावा त्यासाठी जन्माचा दाखला बोर्ड सर्टिफिकेट पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन आधार कार्ड यापैकी एक आणि रहिवासी पुरावा यासाठी रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन बँक पासबुक यापैकी एक असे कागदपत्र आवश्यक आहेत.
जाहिरात
अधिक माहितीसाठी युवकांनी वरील नंबर वर 8055987777 वर मिस कॉल देऊन यशोधन कार्यालय किंवा बी एल ओ यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.