विद्यार्थ्यांना करिअरसाठी अभ्यास आणि आरोग्य महत्त्वाचे – डॉ.जयश्रीताई थोरात
चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जयश्री थोरात यांच्या हस्ते संपन्न
संगमनेर प्रतिनिधी दि १३ जुलै २०२४– मा. शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राची भरभराट ही इतरांना प्रेरणादायी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हे वैशिष्ट्य संगमनेरचा राज्यात गौरवपूर्ण उल्लेख होत असून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्यासाठी अभ्यास आणि आरोग्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यालयात मध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार कॅन्सरतज्ञ जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर विजय राहणे,आनंदराव कढणे,विठ्ठलराव कढणे,रामदास राहणे, अनिल कढणे, संस्थेचे रजिस्ट्रार एम.एम.फटांगरे, कैलास सरोदे, सरपंच भाऊराव राहणे,उप-सरपंच सौ. हौसाबाई कढणे, सोमनाथ काळे, सुरेश राहणे,उपप्राचार्य कैलास राहणे उपस्थित होते.
तसेच यावेळी पहिल्या पगारातील २० हजार रुपये गरीब विद्यार्थी फंडाला दिल्याबद्दल विद्यार्थिनी कुमारी.दर्पणाचे आजोबा भाऊसाहेब राजाराम नेहे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेची नृत्य टीम देशात प्रथम क्रमांक मिळून थायलंड (बँकॉक) येथेआंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या २४ विद्यार्थी व पालकांचा एकत्रित सत्कार करण्यात आला. तसेच जे.इ.इ, सी.ए.टी, स्कॉलरशिप,नवोदय, मंथन, दहावी व बारावीला यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच आजच कॉलेजमध्ये जी.एस व एल.आर पदी निवडून आल्याबद्दल वेताळ व कुमारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, समाजाच्या विकासात शिक्षणाचे मोठे योगदान असून गुणवत्तापूर्ण शिक्षण ही आता आपली ओळख झाली आहे. उच्च गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी मोबाईल कडे दुर्लक्ष करून मैदानाकडे ही वळले पाहिजे अभ्यास आणि आरोग्य या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन बाजू आहेत. मुलांच्या विकासासाठी गोष्टी आवश्यक असतात त्या शाळेमध्ये आहेत. या गावाचे, तालुक्याचे नाव आपण सर्व उज्वल कराल अशी अपेक्षा व्यक्त करते नृत्य, स्कॉलरशिप, नवोदय तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात या शाळेने विद्यार्थी घडवले आहेत त्या पालकांचे, संस्थेचे, शिक्षकांचे गावाचे आपल्या भाषणात कौतुकाची थाप मारली.
ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यासारखे स्वप्न, इच्छा, मेहनत, कष्ट यांचे महत्व सांगून हे सर्व गुण आपल्या आपल्या सर्वांमध्ये आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष भाषण आनंदराव कढणे यांनी केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच कलागुण आहेत व त्यांना आम्ही वाव देतो.यावेळी बोलताना एम.एम.फटांगरे यांनी मत व्यक्त करताना नवीन शैक्षणिक धोरण व नवीन बदल आपण स्वीकारले पाहिजे असे मत व्यक्त केले.यावेळी प्रास्ताविक प्राचार्य अशोक खेमनर यांनी केले .आभार प्रदर्शन भंडकर सुखदेव यांनी मांडले व सूत्रसंचालन डूबे राजेंद्र यांनी केले.यावेळी गावातील ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.