सह्याद्री सेवक पतसंस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
सह्याद्री सेवक पतसंस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
संगमनेर प्रतिनिधी दि १३ जुलै २०२४- सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या पतसंस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय संगमनेर येथील के.बी. दादा हॉलमध्ये संस्थेचे विद्यमान चेअरमन राहुल सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संगमनेर नगरपरिषदेच्या मा.नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे जॉईट सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रार बी. आर. गवांदे यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी दुर्गाताई तांबे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे. सह्याद्री सेवकांची कामधेनु म्हणून सह्याद्री पतसंस्थेचा आलेख नेहमी चांगला राहिला आहे. सभासदांच्या जीवनामध्ये पतसंस्थेने नेहमीच हातभार लावला आहे यावेळी त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सेवानिवृत्त सभासदांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या तर या प्रसंगी चासकर सर व गवांदे सर यांचेही यावेळी मार्गदर्शन झाले. तर दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून सभेला सुरुवात करण्यात आली.
संस्थेचे विद्यमान चेअरमन राहुल सुर्वे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी माहिती देताना संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला असून संस्थेमध्ये सुरू असणाऱ्या कन्यादान निधी योजना, सानुग्रह अनुदान योजना, विविध कर्ज योजना व संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा यावेळी सन्मान सत्कार करण्यात आला. संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेतील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. याप्रसंगी सूत्रसंचलन संस्थेचे माजी चेअरमन गणेश गुंजाळ यांनी केले.