अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलचा इनव्हेसटीचर(शपथविधी)समारंभ उत्साहात पार पडला.
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलचा इनव्हेसटीचर(शपथविधी)समारंभ उत्साहात पार पडला.
संगमनेर प्रतिनिधी दि १३ जुलै २०२४– शुक्रवार, दिनांक १२ जुलै २०२४ रोजी अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलचा इनव्हेसटीचर समारंभ अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे शैक्षणिक संचालक डॉक्टर जे.बी. गुरव, शाळा संचालिका अंजली कन्नावर, मुख्य सल्लागार कु. स्नेहल शेखदार पालक शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठया जल्लोषात साजरा झाला.
निडो स्कूल नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी कार्यरत आहे. स्कूल अंतर्गत नवनिर्वाचित परिषद सदस्यांचे कु. ब्रह्मा ओहोळ (हेडबॉय), कु. रीया पाटणी (हेड गर्ल ),कु. तन्मय सोनवणे( क्रीडा कर्णधार), कु. अन्वित लिंबेकर (एक्सक्वीझिट एम्राल्ड हाऊस कॅप्टन ), कु. विराजस वामन ( रेडियंट रुबी हाऊस कॅप्टन ), कु. आर्यन भांगरे ( स्पार्कलिंग सफायर हाऊस कॅप्टन ), कु.गौरी सांगळे( ग्लिटरिंग टोपाझ हाऊस कॅप्टन ), कु. स्वस्तिका केदार ( रेडियंट रुबी व्हाईस हाऊस कॅप्टन ), कु. वेदांत कडलक ( एक्सक्वीझिट एम्राल्ड व्हाईस हाऊस कॅप्टन ), कु. पृथ्वीराज नेहे (ग्लिटरिंग टोपाझ व्हाईस हाऊस कॅप्टन )आणि कुमार आर्यन शेरमाळे (स्पार्कलिंग सफायर व्हाईस हाऊस कॅप्टन ) या विद्यार्थ्यांना स्कूलच्या संचालिका सौ. अंजली कन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन त्यावेळी त्यांना त्यांचे बॅज अभिमानाने मिळाले. ते नेतृत्वगुणांची जबाबदारी स्वीकारण्याच्या त्यांच्या तयारीचे प्रतीक आहे.