करंजी जिल्हा परिषद शाळेत नव विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात
करंजी जिल्हा परिषद शाळेत नव विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात
करंजी जिल्हा परिषद शाळेत नव विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात

कोपरगाव विजय कापसे दि १७ जुन २०२५–गुणवत्तेचा ध्यास, प्रगतीची आस, मोफत शिक्षणातून करूया सर्वांगीण विकास या म्हणीप्रमाणे चला शाळेत जाऊया शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता करंजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आज सोमवार दि १६ जुन रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवण, उपसरपंच शिवाजी जाधव, राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव प्रा. विजय कापसे, करंजी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन} संतोष आगवन, स्कूल कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे, माजी अध्यक्ष योगेश आगवन, अनिल शिंदे, उपाध्यक्ष एकनाथ कापसे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आगवन, नानासाहेब डोखे, मुख्याध्यापक प्रदीप भाकरे, बाबासाहेब आगवन, नंदकिशोर आगवन, गोकुळ भिंगारे, शिवनाथ डुबे, संभाजी गिरी, विकास भिंगारे, नितीन भिंगारे, नदीम पटेल, देविदास मोरे, संतोष भारती, पप्पू गायकवाड, सलीम शेख, अरबाज पटेल, विशाल आगवन, प्रतीक जोर्वेकर, राहुल गुंजाळ, प्रदीप पगारे, कृष्णा भिंगारे, विठाबाई गायकवाड, गोविंद आगवन, किरण पाईक, संदीप डोखे, प्रदीप पाईक आदी मान्यवर ग्रामस्थ शिक्षण प्रेमी नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सजवलेल्या ट्रॅक्टर मधून डीजेच्या तालात नव्याने इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक व पायातले बुटाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.






