भाजपच्या खोट्या पत्रक बाजीला सुजान संगमनेरकर भुलनार नाही – काँग्रेस शहराध्यक्ष पापडेजा
त्यांची एक तरी काम दाखवा : किंवा सामाजिक कामात एक तरी योगदान दाखवा
संगमनेर प्रतिनिधी दि २१ जुलै २०२४– लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत असतात मात्र काही नव्याने पुढारी होऊ पाहणारे फक्त पत्रक बाजी करतात. खरे तर अनेक दिवस संजय गांधी निराधार योजनेचे बैठका रखडल्याने गोरगरिबांची प्रकरने प्रलंबित होती ती तात्काळ मंजूर व्हावी यासाठी आमदार थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानेच बैठका झाल्या अडवणूक करणाऱ्यांना ही मोठी चपराक होती .त्या पोटदुखीतून ते पत्रक बाजी करत असल्याची टीका शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली असून एक तरी त्यांचे काम दाखवा असेही त्यांनी म्हटले आहे.
पापडेजा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल म्हणून ओळखला जातो. गोरगरिबांच्या विकासासाठी आमदार थोरात यांनी यशोधन कार्यालयातील जनसेवकांच्या मार्फत वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या या पात्र लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व फॉर्म ची पूर्तता करून सदर फॉर्म ही तहसील कार्यालयात जमा केले. मात्र फक्त पक्षपातीपणा आणि राजकारणासाठी अनेक दिवस सध्याची सत्ताधारी आणि प्रशासन यांच्याकडून संजय गांधी निराधार योजनेची बैठक रखडवली गेली. यामुळे त्रास गोरगरिबांना झाला.
अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार थोरात यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून सदर बैठका तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या आमदार थोरात हे वरिष्ठ नेते असून विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत त्याचा सन्मान राखत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संगमनेर तहसीलदार यांना संजय गांधी निराधार योजनेच्या बैठक घेण्याचे निर्देश दिले त्यातून योग्य लाभार्थींना लाभ मिळणार असल्याने अनेक नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला.
मात्र गोरगरिबांच्या योजनांमध्ये ही दडपशाही आणि राजकीय फायदा पाहणाऱ्या भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी अनेक दिवस ही कामे रखडवली. आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून आणि फोनमुळे बैठक होऊन गरिबांना लाभ मिळत आहे .त्याचा भाजपला कोणताही फायदा होणार नसल्याने ते लोक काहीतरी खोटी पत्रक बाजी करत आहेत.यांचे एक तरी काम दाखवा असा प्रश्न संगमनेर तालुक्यातील विचारला जात आहे. त्यांच्या पत्रक बाजीला सुजान संगमनेरकर कधीही भुलणार नाही असेही पापडेजा यांनी म्हटले आहे.