संगमनेर

आमदार सत्यजित तांबे यांची गौरव डोंगरे व अकलापूर ग्रामस्थांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त पेढे तुला

आमदार सत्यजित तांबे यांची गौरव डोंगरे व अकलापूर ग्रामस्थांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त पेढे तुला
आमदार सत्यजित तांबे यांची गौरव डोंगरे व अकलापूर ग्रामस्थांकडून गुरुपौर्णिमेनिमित्त पेढे तुला
जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि २१ जुलै २०२४महाराष्ट्रातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार हे नाशिक पदवीधर मधून मोठ्या मताधिक्याने निवडून यावे यासाठी अकलापूर ग्रामस्थ व एन एस यु आय अध्यक्ष गौरव डोंगरे यांनी केलेल्या नवसाची पूर्तता झाल्याने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये युवक आमदार सत्यजित तांबे यांची पेढे तुला करण्यात आली.

जाहिरात

अकलापूर श्री.दत्त देवस्थान येथे आमदार सत्यजित तांबे यांची पेढे तुला झाली. यावेळी समवेत विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. जि. प. सदस्य अजय फटांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, गौरव डोंगरे, सुरेश कानोरे, बबनराव कुऱ्हाडे, सरपंच अरुण वाघ, सुहास वाळुंज, संपत आभाळे, लहू आभाळे ,नवनाथ आहेर ,रमेश गफले, अक्षय ढोकरे, बाळासाहेब कुराडे, प्रमोद कुरकुटे यांसह अकलापुर मधील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा पुरोगामी विचारांचा आणि माजी आमदार डॉ.तांबे यांच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. पदवीधर निवडणुकीच्या काळात झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एन एस यू आय चे अध्यक्ष गौरव डोंगरे व अकलापूर ग्रामस्थांनी श्री दत्त चरणी आमदार सत्यजित तांबे निवडून येण्यासाठी प्रार्थना केली होती याचबरोबर पेढे तुला करण्याचा नवस केला होता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमदार तांबे यांची पेढे तुला झाली. यावेळी गौरव डोंगरे म्हणाले की, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होत असलेल्या नवसाची पूर्तता ही आनंददायी आहे श्री दत्त महाराज हे तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून पठार भागातील मोठे देवस्थान आहे या भागाच्या विकासासाठी आमदार थोरात यांनी मोठा निधी दिला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी सरपंच अरुण वाघ यांनी आभार मानले पेढे तुला होताच ग्रामस्थ व नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे