संगमनेर

आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापुर ओहरफ्लोचे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी काम– डॉ. थोरात

आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापुर ओहरफ्लोचे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी काम– डॉ. थोरात
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली भोजापुर पूरचारीची पाहणी

संगमनेर प्रतिनिधी दि ८ ऑगस्ट २०२४काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दरवर्षी आग्रहाने लाभ क्षेत्रातील गावांना भोजापूर धरणाचे पाणी देण्याकरता  कारखान्याच्या माध्यमातून चारी दुरुस्तीसह काम करून पाणी दिले आहे आहे. यावर्षीही आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोजापुर ओहरफ्लोचे  पाणी लाभक्षेत्रातील जास्तीत जास्त गावांना देण्यासाठी काम होत असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले असून त्यांनी आज पुरचारीची पाहणी केली.

जाहिरात
भोजापुर लाभक्षेत्रातील गावांना ओव्हरफ्लोचे पाणी देण्यासाठी पळसखेडे, निमोन, सोनेवाडी, पिंपळे व तिगाव माथा येथे पुरचारीची पाहणी डॉ जयश्रीताई थोरात यांनी केली. यावेळी समवेत बी. आर.चकोर, संपतराव गोडगे, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, भारत शेठ मुंगसे, बाबासाहेब कांदळकर , सखाराम शरमाळे ,साहेबराव गडाख, विष्णू ढोले, अनिल घुगे,जनार्दन कासार, ज्ञानेश्वर मुंगसे, ज्ञानेश्वर कडनर, संपतराव कांडेकर, गंगाधर जायभाये, निलेश सांगळे, कीर्ती जायभाये, योगेश सोनवणे, भाऊसाहेब कडनर पांडुरंग फड ,अशोक मुळे, सुभाष सानप ,मनोज सानप, विकी ढोणे, भाऊसाहेब गीते, चांगदेव कांडेकर, दादाहरी डोंगरे, मुन्ना तांबोळी ,गोरख घुगे, आदींसह वरील गावांमधील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुक्याचे कुटुंब प्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गाव व वाडीवस्तीना पाणी देण्यासाठी निळवंडे धरण व कालव्यांसह तालुक्यात  पाझर तलाव, केटीवेअर व  बंधाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे.  याचबरोबर भोजापुर पुरचारीतून लाभ क्षेत्रातील गावांना पाणी मिळावे कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी चारीची दुरुस्ती करून पाणी दिले आहे. याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात  तत्कालीन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून  या चारीच्या दुरुस्ती करता दोन कोटी बारा लाख रुपये निधी मंजूर घेतला.

जाहिरात

नुकताच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने भोजपुर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आता या पूरचारीतून निमोन, सोनेवाडी ,पळसखेडे, पिंपळे, क-हे, या गावांसह लाभ क्षेत्रातील सर्व गावांना पाणी मिळावे व या गावांमधील तलाव बंधारे भरले जावे याकरता  नियोजन करण्यात येत आहे.

भोजापुरचे पाणी तिगाव माथ्यापर्यंत देण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने ही चारी निर्माण करण्यात आली. पुढे आमदार थोरात हे मंत्री झाल्यानंतर शासनाकडे ही पुरचारी त्यांनी वर्ग केली. भोजापुरचे पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न असल्याचेही डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.

तर बी आर चकोर म्हणाले की, आमदार थोरात यांच्या माध्यमातून भोजापुर धरणातून निमोन, क-हे ,सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांकरता ग्रॅव्हिटीद्वारे पिण्याच्या योजना सुरू झाली आहे. या विभागाच्या विकासाकरता आमदार थोरात यांनी सातत्याने निधी दिला असून अनेक कामे मार्गी लावली आहेत. तर सुभाष सांगळे म्हणाले की, भोजापूरचे पाणी तिगाव देवकवठे यांसह कार्यक्षेत्रातील सर्व गावांना मिळावे याकरता आमदार थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने मोठी मदत केली आहे यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभक्षेत्रातील सर्व गावांमधील युवक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे