गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात इन्टरॅक्टीव्ह पॅनलचे आमदार तांबेच्या शुभहस्ते उद्घघाटन
गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात इन्टरॅक्टीव्ह पॅनलचे आमदार तांबेच्या शुभहस्ते उद्घघाटन
गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात इन्टरॅक्टीव्ह पॅनलचे आमदार तांबेच्या शुभहस्ते उद्घघाटन
संगमनेर प्रतिनिधी दि ६ सप्टेंबर २०२४– सोमवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता विद्यालयात आठ पॅनल बोर्डचे उद्घघाटन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत (दादा) तांबे पाटील, तसेच सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव दत्तात्रय चासकर, संस्थेचे रजिस्ट्रार बी.आर.गवांदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा. के.जी.खेमनर सर ,विद्यालयाच्या सन १९९० – ९१ शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी , तसेच उपमुख्याध्यापक डोखे सर , रनशूर मॅडम , तज्ज्ञ शिक्षक प्राचार्य अशोक गिते उपस्थित होते.
या प्रसंगी अध्ययन-अध्यापनात बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. असे आ.तांबे म्हणाले. विद्यालयास आ.तांबे यांच्या निधितुन एक, विद्यालयातील १९९०-९१ च्या १० वी च्या बॅच च्या विद्यार्थ्यांकडून एक, सह्याद्री विद्यालय विद्यार्थी ग्राहक भांडार निधितुन तीन, सह्याद्री विद्यालय शिक्षक व शिक्षिका यांचेकडून दोन तर .प्रसाद दत्तात्रय चासकर यांचेकडून एक असे आठ पॅनेलचे विद्यालयात उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मनोज उपरे, रुपेश भालेराव,दत्ता अभंग ,अनिल सातपुते ,धीरज देशमख, अँड. मिनल देशमुख, हरीश कांगणे, संजय मंडलिक ,सुनील मंडलिक ,गणेश परदेशी ,फारुक तांबोळी, राधेश्याम कोल्हे ,नगरसेवक नितीन अभंग,अँड .प्रशांत गुंजाळ, विद्यालयातील सुरेखा दिघे ,एस.एम.खेमनर, सर,नेहे यु.आर.सर, आर.एल.अभंग सर मिलिंद औटी सर , ए.टी.दिघे सर, किरणं आल्हाट सर,प्रा दातिर सर,तुषार गायकर सर ,प्रदीप गोसावी उपस्थित होते.या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जेष्ठ शिक्षक खेमनर एस.एम. सर यांनी केले.