आपला जिल्हा

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बारामती येथे पवार कुटुंबीयांचे सांत्वन

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बारामती येथे पवार कुटुंबीयांचे सांत्वन

अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२६ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले अजित दादा पवार यांच्या आकस्मात निधनाने महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली असल्याचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांनी आज पवार कुटुंबियांचे सांत्वन केले.

जाहिरात

बारामती येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले याप्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, उपस्थित होते या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

जाहिरात

याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1990 पासून अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. ग्रामीण आणि शहरी प्रश्नांची जाण असलेला हा मोठा नेता होता. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला बळकटी दिली. आपल्या रोखठोक स्वभावांमधून राजकारणात आणि समाजकारणात मोठे स्थान निर्माण केले.

प्रशासनावर पकड असलेले अजित दादा हे हजरजबाबी होते. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व असलेल्या अजितदादा आणि आपण मंत्रिमंडळात अनेक वर्ष काम केले. पटकन निर्णय घेऊन पाठपुरावा करण्याची त्यांची पद्धत लोकप्रिय होती. राजकारणात असूनही तोंडावर स्पष्ट बोलणारे दादा हे महाराष्ट्राचे लाडके होते.

विविध खात्यांचे मंत्रीपद सांभाळताना त्यांनी त्या खात्याला अधिक गतिमानता दिली. कोरोना संकटाच्या काळात एकदिलाने आम्ही सर्वांनी काम केले .पक्ष वेगळे असले तरी मनाने कायम आम्ही एकत्र राहिलो. अजितदादा आज नाहीत ही कल्पना होत नाही. 28 जानेवारी रोजी झालेला अपघात हा सर्वांसाठी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्याचा मोठा उमदा नेता गमावला असून कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ नेते पवार साहेब सुनेत्राताई पवार आणि सर्व पवार कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे