आ. थोरात,खा. गोवाल पाडवी यांच्या उपस्थितीत बुधवारी कोळवाडेत भव्य आदिवासी मेळावा
मा.आ.डॉ.सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांची उपस्थिती
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
संगमनेर विजय कापसे दि २९ सप्टेंबर २०२४– राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वा. जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे येथे नंदुरबारचे खासदार ॲड.गोवाल पाडवी व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ.सुधीर तांबे व आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जयहिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे ही गुणवत्ता, उत्कृष्ट निकाल , शिस्तप्रिय वातावरण,दर्जेदार सुविधा, विविध मानांकने यामुळे राज्यातील आदिवासी शाळांसाठी मॉडेल ठरली आहे. २ ऑक्टोबर रोजी या शाळेचा वर्धापन दिन असून यानिमित्त भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त हा भव्य आदिवासी मेळावा होत असून यावेळी नंदुरबार लोकसभेचे सदस्य खासदार ॲड गोवाल पाडवी व विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मा आमदार डॉ. सुधीर तांबे, विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव, युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, फादर रॉबर्ट डिकोस्टा, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत भाऊ थोरात, गणपतराव सांगळे, शंकरराव पा. खेमनर ,सुधाकर जोशी, प्रा. बाबा खरात, संपतराव डोंगरे ,मिलिंद कानवडे, काशिनाथ गोंधे ,भाऊसाहेब नवले, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, गटविकास अधिकारी अनिल नागणे ,तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व विविध शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व आदिवासी बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे व कोळवाडे ग्रामस्थ, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.