संगमनेर

सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम अमृतवाहिनी बँकेच्या राहता शाखेचा शुभारंभ

सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी काम अमृतवाहिनी बँकेच्या राहता शाखेचा शुभारंभ
एकेकाळचा समृद्ध राहता तालुका आता अडचणीत- आमदार थोरात
राहता विजय कापसे दि ११ ऑक्टोबर २०२४गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण करायचे असते. मात्र येथे दहशत व दडपशाहीचे राजकारण आहे. एके काळचा समृद्ध असलेला राहता तालुका आता अडचणीत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून आमचा हेतू हा प्रामाणिक व जनतेच्या हिताचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जाहिरात

कुंदन लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ सुधीर तांबे , ॲड. नारायणराव कारले, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी ,सौ प्रभावतीताई घोगरे ,व्हाईस चेअरमन ॲड .नानासाहेब शिंदे. डॉ. राजेंद्र पिपाडा, डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, सुधीर लहारे, विजय दंडवते,सौ शितलताई लहारे, सुरेंद्र खर्डे, राजेंद्र घोगरे, सुधीर मस्के, नितीन सदाफळ ,सुरेश थोरात, आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर संगमनेर तालुक्यातील सहकाराची वाटचाल सुरू असून अमृतवाहिनी बँकेमध्ये 500 कोटींपेक्षा जास्त ठेवी आहेत. एनपीए अत्यंत कमी असून बँकेने उत्कृष्ट मानांकाने मिळवली आहेत .पतसंस्था आणि सहकारी बँका मिळून संगमनेर तालुक्यात 7900 कोटींच्या ठेवी आहेत. यावरून तेथील समृद्धी कळते. संगमनेरच्या सहकार ,दूध व्यवसाय ,फळबागा, शेती आर्थिक उलाढाल मोठी आहे.

जाहिरात

एकेकाळी राहता तालुका हा सुद्धा पेरूच्या बागाने समृद्ध होता. मोठी आर्थिक समृद्धी होती. परंतु आता येथे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गणेश कारखाना त्यांनी आठ-दहा वर्ष चालवला मात्र तेथील अधिकारी, पेट्रोल पंप हे दुसऱ्या कारखान्यातून चालवले जात होते. जनतेच्या आग्रहास्तव विवेक कोल्हे आणि आम्ही या कारखान्यात लक्ष घातले .जनतेने मोठा विश्वास ठेवला आणि हेतू प्रामाणिक व चांगला असल्याने कारखाना सुरळीत सुरू झाला. मात्र तरीही कर्ज मिळवण्यात अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. केसेस टाकल्या जात आहेत. राजकारण्यांनी नेहमी चांगल्या कामाशी पाठीशी उभे राहिले पाहिजे .परंतु येथे असे होत नाही .येथे दहशतीचे झाकण काही प्रमाणात उडवले आहे .थोडेफार राहिले तेही उडवू या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी एकजुटीने  काम करू मात्र जनतेला ही बाहेर यावं लागेल .सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आपला हेतू असून या कामाला परमेश्वराचे आशीर्वाद असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे

जाहिरात

तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, सहकारातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. आणि चांगला सहकार देशात कुठे पाहायचा असेल तर संगमनेर आहे. अमृतवाहिनी बँक राहता परिसराच्या विकासात योगदान देईल असे ते म्हणाले मा आमदार डॉ तांबे म्हणाले की, संगमनेरच्या सहकार हा  आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी आदर्श मॉडेल आहे. राहता तालुक्यातील माणसे चांगले आहेत .परंतु येथील विकासाला खोडा घातला जात आहे .सहकार हे पवित्र माध्यम आहे. ते जपून काम केल्यास या परिसरातही समृद्धी निर्माण होईल असे ते म्हणाले तर नारायणराव कारले म्हणाले की गणेश कारखान्यात अनेक अडचणी निर्माण करण्यात येत आहे.

यावेळी मामा पगारे, श्रीकांत लोळगे ,धनंजय गाडेकर, गणपतराव सांगळे, ॲड पंकज लोंढे, शशिकांत लोळगे, श्रीकांत मापारी, सचिन चौगुले, नवनाथ आंधळे, यांच्यासह राहता तालुका महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले तर व्हा.चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले यावेळी नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रतन टाटा यांना श्रद्धांजली  व अभिवादन 
देशभक्त उद्योगपती तथा महाराष्ट्र भूषण रतनजी टाटा यांचे वृद्धप काळाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली व अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे