थोरात कारखान्याचा गुरुवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ
थोरात कारखान्याचा गुरुवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ
काँग्रेस पक्ष वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात १० लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप केले आहे. शेतकरी,सभासद, कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास असून या कारखान्याने यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना सातत्याने सर्वाधिक भाव दिला आहे.
चालू वर्ष २०२४-२५ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभाची गुरुवारी कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रखमा हासे व त्यांच्या सुविध पत्नी सौ.मनीषाताई संतोष हासे, संचालक चंद्रकांत भिकाजी कडलग व त्यांच्या सुविध पत्नी सौ.वैशालीताई कडलग, मिनानाथ गोपीनाथ वर्पे व त्यांच्या सुविध पत्नी सौ.हिराताई मिनानाथ वर्पे, भाऊसाहेब गीताराम शिंदे व त्यांच्या सुविध पत्नी पुष्पाताई भाऊसाहेब शिंदे,विनोद गणपत हासे व त्यांच्या सुविध पत्नी सौ.वैशालीताई विनोद हासे यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन पूजा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व शेतकरी, ऊस उत्पादक व सभासद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.