संगमनेर

स्व.इंदिराजी गांधी यांना ३१ ऑक्टोबर रोजी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन

स्व.इंदिराजी गांधी यांना ३१ ऑक्टोबर रोजी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन
स्व.इंदिराजी गांधी यांना ३१ ऑक्टोबर रोजी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ३० ऑक्टोबर २०२४- भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या ४० व्या पुण्यतिथी निमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गुरुवार दि ३१ ऑक्टो २०२४  रोजी सकाळी ८.३० वा. अमृत उद्योग समूहाच्या वतीने पुष्पांजली अर्पण व अभिवादन कार्यक्रम मा.महसूलमंत्री व विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांचे अध्यक्षतखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

जाहिरात
बालवयापासूनच स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेवून देशाच्या एकात्मतेसाठी व अखंडतेसाठी बलीदान देणाऱ्या स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचा स्मृतीदिन दरवर्षी अमृत उद्योग समूहाच्या वतीने कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजीत केला जात आहे. गुरुवार दि ३१ ऑक्टो रोजी स.८.३० वा ”शक्तीस्थळ ”  येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या वेळी प्रियदर्शनी भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान होणार आहे.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी युवा आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा.खेमनर,ॲड.माधवराव कानवडे, नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात,इंद्रजीत भाऊ थोरात, तालुका कॉग्रेस अध्यक्ष मिलींद कानवडे, लक्ष्मणराव कुटे,नवनाथ अरगडे, सुधाकर जोशी,शंकरराव खेमनर,संपतराव डोंगरे, आर.एम.कातोरे,हौशीराम सोनवणे, सुरेश थोरात, सुधाकर रोहम,सौ.अर्चनाताई बालोडे, सौ.निर्मलाताई गुंजाळ, सोमेश्वर दिवटे, प्रा.बाबा खरात,राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

जाहिरात

तरी या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी मोठया संखेने उपस्थित रहावे असे अवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे,सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे