संगमनेर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना ही अमूल्य देण – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना ही अमूल्य देण – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

डॉ.आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना समतेचा अधिकार – माजीमंत्री बाळासाहेब थोरात ; महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगमनेर मध्ये अभिवादन

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ६ डिसेंबर २०२४–  दिन दलितांच्या हक्कासाठी मोठा संघर्ष करणारे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जात आहे. मानवता धर्म जोपासणाऱ्या राज्यघटनेची अमूल्य देणगी त्यांनी देशवासीयांना दिली असून या संविधानामुळे सर्वांना समतेचा अधिकार मिळाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासहित त्यांनी अभिवादन केले. या प्रसंगी मा.आमदार डॉ.सुधीर तांबे,सौ.दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, कुसुमताई माघाडे, के.एस. गायकवाड,अमित सोनवणे, बौद्धाचार्य परार,गौतम गायकवाड, प्रा.बाबा खरात, अरुण काका गावित्रे, विनोद गायकवाड, बाळासाहेब पवार, राणी प्रसाद मुंदडा, सुभाष दिघे, जावेद पठाण, बादल जेधे, कपिल टाक आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर दिन दलित आणि गोरगरिबांसाठी जे मोठे संघर्ष आहेत त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला लढा हा सर्वात मोठा आहे. सर्व संत व समाज सुधारक यांना अपेक्षित मानवतेचा धर्म सांगणारी राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासीयांना दिली. राज्यघटनेमुळे सर्वांना समतेचा अधिकार मिळाला आहे. ही राज्यघटना प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची असून सध्या संविधान धोक्यात आले आहे.

या संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.याचबरोबर जातीयवादी तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींपासून तरुणांनी दूर राहावे असे आवाहनही त्यांनी केले. तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता व बंधुता या तत्त्वांच्या विरोधात काही धर्मांध शक्ती काम करत आहेत. दररोज राज्यघटना कमकुवत केली जात आहे. धर्माच्या नावावर राजकारण करून समाजात भांडणे लावली जात आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात कारखाना व यशोधन येथे ही अभिवादन

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तर यशोधन जनसंपर्क कार्यालय येथेही अभिवादन करून प्रा.बाबा खरात यांनी प्रबोधनाची गीते गायली यावेळी विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे