यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून जळालेल्या ट्रान्सफॉर्मर ठिकाणी नवीन ३०० ट्रान्सफार्मर

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून जळालेल्या ट्रान्सफॉर्मर ठिकाणी नवीन ३०० ट्रान्सफार्मर

Sangmner vijay kapse दि १० जुन २०२६-–महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जळालेल्या ३०० ट्रान्सफार्मरच्या ठिकाणी नव्याने ३०० ट्रान्सफार्मर

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून १७१ गावे व २५८ वाड्या वाचल्या आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विद्युतीकरणाचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मागील काही महिन्यातील वाढलेली उष्णता यामुळे शेती व घरगुती वापरासाठी विजेचा जास्त प्रमाणात वापर झाला. अनेक ठिकाणी ३०० ट्रान्सफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांनी यशोधन कार्यालयाकडे नवीन ३०० ट्रान्सफार्मर बसवण्याकरता सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे


यशोधन कार्यालयाच्या वतीने आलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी नव्याने ट्रान्सफॉर्मर मिळावा याकरता शासनाच्या वीज वितरण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. या माध्यमातून तालुक्यात ३०० नवीन ६३ केव्ही व १०० के व्ही चे ट्रान्सफार्मर बसवण्यात आले. यामध्ये तळेगाव, साकुर, वडगाव पान, जोर्वे धांदरफळ, आश्वी, घुलेवाडी, समनापुर गटामधील विविध गावांमध्ये बसवण्यात आले आहे. वीज पुरवठा नियमित व सुरळीत व्हावा याकरता या ३०० ट्रान्सफार्मरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी मदत होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. लोहारे येथील कदम , अभंग व पवार वस्ती येथे या योजनेअंतर्गत १०० केव्ही ट्रान्सफार्मर उपलब्ध करून देण्यात आला.
शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यशोधन कटिबद्ध
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवले जातात. विविध गावांमधील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीवरून त्यांचे जळालेले ट्रान्सफॉर्मर वीज वितरण विभागाच्या सहकार्याने नव्याने बसवण्यात आल्याने शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळणार आहे
डॉ जयश्री थोरात
संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष



