आपला जिल्हा

के .जे. सोमैया ( वरिष्ठ ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

के .जे. सोमैया ( वरिष्ठ ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

के .जे. सोमैया ( वरिष्ठ ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ जुन २०२५कोपरगांव येथील के .जे. सोमैया ( वरिष्ठ ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन आज २१ जून २०२५ रोजी योग दिन साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. व्ही . सी. ठाणगे  यांनी दिली.  महाविद्यालयाच्या एन.सी.सी., एन.एस.एस., क्रिडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग शिबिरात प्रज्वल ढाकणे व प्रा. डॉ. व्ही एस.साळुंखे यांनी योग, प्राणायाम व व्यायामाचे विविध प्रात्यक्षिके विद्यार्थांसमोर केली.

जाहिरात

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे यांनी योगाचे महत्त्व नमूद करतांना सांगितले कि ‘मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगासनांचे मोलाचे स्थान आहे.’

जाहिरात

याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, शा. शि. संचालक डॉ.सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे, एन.सी.सी. महिला प्रमुख लेफ्टनंट प्रा. वर्षा आहेर एन .एस .एस विभाग प्रमुख प्रा. डॉ.बी एस गायकवाड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे