संगमनेर

आ.सत्यजित तांबे यांनी केली सपत्नीक स्वामी समर्थ केंद्रात आरती

आ.सत्यजित तांबे यांनी केली सपत्नीक स्वामी समर्थ केंद्रात आरती
आ.सत्यजित तांबे यांनी केली सपत्नीक स्वामी समर्थ केंद्रात आरती
संगमनेर विजय कापसे दि ३ जानेवारी २०२५नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे व त्यांच्या सुविध्य पत्नी डॉ.मैथिलीताई तांबे यांनी संगमनेर मधील स्वामी समर्थ सेवा केंद्र आज आरती करून सर्व जनतेला सुख समृद्धी व चांगले आरोग्य मिळावे यासाठी प्रार्थना केली.

जाहिरात
शनी मंदिर परिसरात असलेल्या म्हाळुंगी नदी तिरावरील स्वामी समर्थ सेवा केंद्रात आमदार सत्यजित तांबे व डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते आर्थिक करण्यात आली यावेळी या ट्रस्टचे अध्यक्ष मोतीभाऊ झवर व सर्व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की, अध्यात्म ही माणसाला जगण्याची मोठी ऊर्जा देते. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रावर आम्हा सर्वांची मोठी श्रद्धा असून लहानपणापासूनच मी या मंदिरामध्ये येत असतो. येथील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आणि या परिसराची प्रगती सातत्याने करण्याचे काम या सेवाभावी प्रश्न केले आहे. लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सातत्याने या सेवा केंद्रासह परिसराच्या विकासासाठी मोठी मदत केली असून यापुढेही आपल्याला ही परंपरा कायम ठेवायची आहे हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे काम ही सगळी मंडळी करत असून जी काही मदत करता येईल ती आपण सातत्याने करत आहोत.

जाहिरात

येणाऱ्या नवीन वर्षामध्ये संगमनेर मधील सर्व नागरिक बंधू भगिनींना चांगले आरोग्य व समृद्धी मिळावी याचबरोबर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा अशी प्रार्थना ही आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी केली. या आरतीसाठी संगमनेर शहरातील सर्व सेवेकरी यांच्यासह नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे