संगमनेर

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

लायन्स क्लबच्या वतीने संगमनेर मध्ये ११ ते १३ जानेवारी काळात भव्य शिबिर

जाहिरात आत्मा

संगमनेर विजय कापसे दि ८ जानेवारी २०२५सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर मध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीने ११ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे लायन्स क्लबच्या अध्यक्षा राखी करवा यांनी दिली आहे.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण केली आर्थिक शिस्त विकासाची परंपरा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला वैभवशाली बनवले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संगमनेर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते.

जाहिरात

यावर्षी ही जयंती व डॉ शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्लास्टिक सर्जरी ११ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ रोजी  डॉ प्रवीण पानसरे यांचे धन्वंतरी हॉस्पिटल येथे होणार आहे.

जाहिरात

या मोफत प्लास्टिक शिबिर सर्जरी मध्ये दुबगलेले ओठ व टाळू ,नाक व कान यावरील बाह्य विकृती. तसेच जन्मता फाटलेले ओठ व टाळूंच्या शस्त्रक्रिया, छोटे कान ,तिरपे नाक तिरपी हानवुटी इत्यादीसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियांसाठी डॉ. शरद कुमार दीक्षित यांच्या समवेत काम केलेले अमेरिकेतील त्यांचे सहकारी डॉ लेरी व्हेन स्टेन, डॉ .बैरी सिट्रोन ,डॉ.लेडीज ब्रेन, डॉ लिंडा पीटरसन व त्यांचे सहकारी येणार आहे.

जाहिरात

अमेरिकेहून संगमनेर मध्ये येऊन अनेक डॉक्टर रुग्णांची मोफत सेवा करणार असून या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष राखी करवा, सचिव डॉ.अबोली गांधी ,खजिनदार ला.श्वेता जाजू, श्रीनिवास पगडाल ,डॉ. सुचित गांधी, डॉ प्रवीण कुमार पानसरे ,डॉ.जयश्रीताई थोरात पाटील सह विविध मान्यवरांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे