प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा रोहित काले यांच्या शुभहस्ते शुभारंभ
प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा रोहित काले यांच्या शुभहस्ते शुभारंभ
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि २९ जुन २०२६-रविवार दि २८ जुन रोजी संबंध राज्यात प्लस पोलिओ मोहीम राबविण्यात आली असून कोपरगाव शहरात देखील कोपरगाव नगरपालिका पोलिओ लसीकरण केंद्रात कालांश राजगिरा लाडूचे उद्योगजक रोहित काले यांच्या शुभहस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
जाहिरात
या प्रसंगी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान, नगरसेवक विनोद राक्षे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगरसेविका विद्या सोनवणे, कालांश राजगिरा लाडूच्या संचालिका रेणुका काले यांच्या सह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक तसेच लसीकरण मोहिमेतील सर्व पदाधिकारी सरकारी अधिकारी आणि पालक उपस्थित होते.जाहिरात
यावेळेस परिसरातील साधारण १०० हुन अधिकच्या बालकांना प्लस पोलिओचा डोस देण्यात आला तर या प्रसंगी नगराध्यक्ष पराग संधान यांनी उपस्थित सर्व पालकांनी आपल्या पाल्याला नजीकच्या पोलिओ लसीकरण केंद्रात नेत पोलिओ डोस पाजून घेत पोलिओ मुक्त भारत साकार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन केले.