येवला आत्मा मालिक गुरुकुल मध्ये शिक्षक दिन साजरा
येवला आत्मा मालिक गुरुकुल मध्ये शिक्षक दिन साजरा
येवला आत्मा मालिक गुरुकुल मध्ये शिक्षक दिन साजरा

येवला विजय कापसे दि १० सप्टेंबर २०२५–विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम येवला गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून गुरुकुलात शिक्षक दिन साजरा झाला. याप्रसंगी हनुमंत भोंगळे, हेमंत शाह,कंकाली महाराज, तुषार कापसे उपस्थित होते.

इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली.आणि इयत्ता नर्सरी ते आठवीपर्यंतच्या वर्गांवर तासिका घेतल्या. प्राचार्यांची भूमिका रुद्राक्ष हेडगिरे यांनी साकारली तर साईश वाघमोडे यांनी उपप्राचार्य यांची भूमिका साकारली. तसेच साहिल कायस्थ, सार्थक भडांगे,सृष्टी रायजादे,, रोहिणी जाधव, प्रणव दारुंटे, राधिका परदेशी, मयुरी मगर, स्पंदन लहरे, अश्विन कुमकर,शमिका पावटेकर, प्रज्ञा लोणारी, खुशी साह, तनिष्का ढोपरे, दिव्या जगताप, गीत गुप्ता,संस्कृती शिंदे,वेदांती हंडी, देवांश पाटील,साई नवले,जयेश निकुंभ, सृष्टी घोडके,आदित्य देशमुख, रोहन परदेशी, ऋषिकेश आम्ले, समर्थ लचके, साई चांदवाडे, ओमकार पवार, सिद्धेश चव्हाण, निशांत परदेशी, सुयश भोरकडे, समृद्धी गुप्ता,तपस्या कुऱ्हे, आदित्य शिंदे, वंश बिवाल इ. विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा ही शिक्षकांप्रमाणे चालविली.

अध्यक्ष यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो याबद्दल अधिक माहिती सांगितली.सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.विद्यार्थी प्रतिनिधी मधून शमिका पावटेकर हिने शिक्षक दिनाबद्दल मनोगत व्यक्त केले. शिक्षकांची भूमिका केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी दिवसभरातील आपापले अनुभव सांगितले. तुषार कापसे यांनी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधींमधून मयुरी मगर व राधिका परदेशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.



