संगमनेर
चाळीस वर्षांची परंपरा आणि प्रगती आमदारांना तीन महिने ही सांभाळता आली नाही- शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर दिवटे
चाळीस वर्षांची परंपरा आणि प्रगती आमदारांना तीन महिने ही सांभाळता आली नाही– शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर दिवटे

संगमनेर विजय कापसे दि १५ मार्च २०२५– तळहाताच्या फोडाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्ष संगमनेर तालुक्याला सांभाळलेले आहे, म्हणूनच महाराष्ट्राच्या विकसित तालुक्यांमध्ये संगमनेरची गणना होते. अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आ. अमोल खताळ यांनी आपण विखे यांना नाही तर संगमनेरकरांना बांधील आहोत याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने साधे नियोजन ज्यांना करता येत नाही, त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे असा घनाघाती आरोप संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला.




