संगमनेर

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समाज निर्मितीचा विचार पुढे न्या – लोकनेते बाळासाहेब थोरात

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समाज निर्मितीचा विचार पुढे न्या – लोकनेते बाळासाहेब थोरात

महाराजांचा आदर्श राज्य व समाज निर्माण करण्याचा विचार जपा – बाळासाहेब थोरात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत राजकारण दुर्दैवी – आमदार सत्यजीत तांबे

स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रम

जाहिरात कोल्हे

संगमनेर विजय कापसे दि १७ मार्च २०२५अत्यंत उत्कृष्ट सजावट, विद्युत रोशनाई, मैदानी खेळ, आतिश बाजी आणि भगवे वातावरण यामुळे सजलेल्या संगमनेर बस स्थानक परिसरात अलोट गर्दीत व मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचा देखावा लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार तांबे यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला. यावेळी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आदर्श राज्य व समाज निर्माण करण्याचे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, सर्व संत यांचे विचार घेऊन आपण पुढे जात असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत होणारे राजकारण हे दुर्दैवी असल्याची टीका आमदार सत्यजित तांबे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

जाहिरात आत्मा

संगमनेर हायटेक बस स्थानक परिसरात स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचन  थोरात,  दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, गणेश मादास, निखिल पापडेजा, किशोर टोकसे, वैष्णव मुर्तडक,  शरयू ताई देशमुख, अमर कातारी, नितीन अभंग,सुनिल मादास,राणी प्रसाद मुंदडा, जीवन पंचारिया,शुभम पेंडभाजे मनिष राक्षे, हृतिक राऊत,रमेश नेहे आदींसह संगमनेर शहरांमधील सर्व संघटना विविध राजकीय पक्ष, सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे बस स्थानकावर आगमन झाले. पारंपारिक दांडपट्टा, तलवारबाजी यांसह 600 खेळ झाल्यानंतर आई तुळजाभवानीची आरती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती नंतर मंदिर खुले करण्यात आले यावेळी प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.

जाहिरात

याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर मध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्वांनी एकत्र येऊन महाराजांची जयंती साजरी करण्याची वर्षानुवर्ष परंपरा होती. सगळ्यांनी मतभेद विसरून महाराजांची एकत्र जयंती करावी ही आपली कायम पद्धत राहिली. परंतु यावेळेस वेगळे चित्र पहावयास मिळते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील अठरापगड जातीतील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव आपले आदर्श आहेत. महाराजांची युद्धनीती, जनकल्याणाची कामे,कायदा सुव्यवस्था,लोकशाही, आदर्श राज्य व्यवस्था याबाबत संपूर्ण जगाला ते आदर्शवत आहेत. आदर्श राज्य, स्वराज्य व आदर्श समाज निर्माण करण्याचा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विविध संत, समाज सुधारक यांचा हा विचार घेऊन आपल्या सर्वांना पुढे जायचे असल्याचे ते म्हणाले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शिवजयंतीच्या निमित्ताने मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. जागा मिळवण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. ही जागा आपल्याला देऊ नये यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकला गेला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांनी जगाला दिशा दाखवली. त्यांच्या जयंती मधले कसले राजकारण करता असा सवाल विचारताना महाराजांच्या जयंती मध्ये कधीही राजकारण नको जात-पात धर्म नको. संगमनेर बसस्थानकासमोर अश्वारूढ पुतळा व्हावा याकरता 2017 मध्ये सौ. दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असताना नगरपरिषदेने ठराव केला. 2024 मध्ये आपण ही जागा मंजूर करून घेतली निधीची मागणी केली.

बस स्थानकासमोर दर्शनी भागात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करणार आहोत. याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा, संविधान स्मारक शहीद स्मारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महापुरुषांच्या स्मारकामध्ये श्रेयवाद नको. प्रत्येकाने त्यामध्ये योगदान द्यावे. प्रशासनावर प्रचंड दबाव असतानाही त्यांनी मंदिर उभारण्यासाठी परवानगी दिली याबद्दल आणि अत्यंत सुंदर देखावा केल्याबद्दल स्वाभिमानी शहर व तालुका शिवजयंती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाचे स्वागत डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले.

यावेळी संगमनेर शिवजयंती उत्सव समिती त्यांचे सर्व पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन,संगमनेर मधील सर्व सेवाभावी संघटना,सर्व गणेश मंडळे,युवक संघटना, महिला मंडळ, विविध राजकीय पक्ष या सर्वांचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भव्य आतिषबाजीसह परिसर गर्दीने फुलून गेला

स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिर देखावा परिसरात अत्यंत सुंदर आरस करण्यात आली आहे. याचबरोबर महाराजांच्या मंदिरासमोर आई तुळजाभवानीचे मंदिर व मूर्ती बसवण्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महाराजांची प्रसन्न मूर्ती असून हे मंदिर पुढील दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे. येथे येऊन प्रत्येकाने दर्शन घेऊन महाराजांचा समतेचा विचार पुढे घेऊन जावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे