संजीवनी शैक्षणिक संस्था

संजीवनी सैनिकी स्कूलचा संदिप गायकवाड इ.१० वीत ९३.८० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

संजीवनी सैनिकी स्कूलचा संदिप गायकवाड इ.१० वीत ९३.८० टक्के गुण मिळवुन सर्व प्रथम

स्कूलच्या १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम
जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २९ मे २०२४: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी सैनिकी स्कूलचा इ. १० वीचा निकाल १०० टक्के लागला अुसन यात कृष्णा  संदिप गायकवाड याने शेकडा ९३. ८० टक्के गुण मिळवुन स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. महाराष्ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने नुकतेच हे निकाल जाहिर केले. यात संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून स्कूलचा दर्जा व गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे, अशी  माहिती स्कूलने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

        पियुष कचेश्वर  गुंड हा ९२. २० टक्के गुण मिळवुन दुसऱ्या  क्रमांकाचा मानकरी ठरला. सार्थक नानासाहेब मढवई याने ९१ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला. गौरव शिवराम  पाटील याने ९०. ८० व श्रीपाद महेंद्र काटकर याने ९०. ६० टक्के गुण मिळवुन अनुक्रमे चौथा व पाचवा गुणानुक्रम प्राप्त केला. एकुण ४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांनी ८० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले तसेच वर्षभर शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे  चीज केले. उर्वरीत १० विद्यार्थ्यांनी ७० ते ७९ टक्यांमध्ये गुण मिळविले.

जाहिरात

         संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य कैलास दरेकर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

जाहिरात
प्रथम तीन

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे