आपला जिल्हा

डॉ.अनिरुद्ध वनकर यांच्या वादळवारा गीतांनी संगमनेरकर भारावले.

डॉ.अनिरुद्ध वनकर यांच्या वादळवारा गीतांनी संगमनेरकर भारावले.

डॉ. वनकर यांचा वादळवारा गीतांचा कार्यक्रम संस्मरणीय अभूतपूर्व : समतेच्या गीतांमधून मानवतेचा बंध

हजारो संगमनेरकरांच्या उपस्थितीत, शिव, शाहू ,फुले, आंबेडकरांच्या विचारांचा जागर

संगमनेर विजय कापसे दि ३ मे २०२५-देशात दुर्दैवाने जातीभेदाचा वनवा पेटला आहे. आपल्या गीतांमधून हा वनवा विझवण्याचे काम समतेचा पुरोगामी विचार घेऊन डॉ. अनिरुद्ध वनकर काम करत असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून हजारो संगमनेरकरांच्या उपस्थितीत शिव,शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारांवर विविध गीतांमधून समतेचा आणि मानवतेचा मंत्र देत डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले. अत्यंत संस्मरणीय झालेला हा कार्यक्रम संगमनेरकरांसाठी अभूतपूर्व ठरला.

जाहिरात

संगमनेर काँग्रेस, छत्रपती प्रतिष्ठान, व बहुजन विचार मंच यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशोधन मैदानावर संयुक्त जयंती सोहळ्यात डॉ.अनिरुद्ध वनकर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला. यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ.जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, डॉ.हसमुख जैन, सौ.शरयूताई देशमुख,सुधाकर जोशी, छत्रपती प्रतिष्ठानचे सचिन आहेर,प्रशांत गायकवाड यांच्यासह युवक काँग्रेस व छत्रपती प्रतिष्ठानचे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीलाच डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हे एकतेचे गीत गायले. यावेळी उपस्थित सर्वांच्या अंगावर शहारे आले. त्या पाठोपाठ जातीयवादावर आणि कायदे व्यवस्थेवर आसूड ओढत ईव्हीएम घोटाळ्या करणाऱ्या सरकारवर कडाडून प्रहार केला.

जाहिरात

संविधान लिहून भीमा तू जगण्याचे बळ दिले, काळोखातून ज्योत पेटवून रान मोकळे केले हे गीत गायले. मतलबासाठी काही धार्मिक शक्ती राजकारणी लोक महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी अंधश्रद्धेवर प्रहार करताना खतरे मे खतरा बिठाया तीर्थ बनाया पानी, दुनिया भाई दिवानी, पैसो की धूळदानी ही कबीरवानी गायली. यावेळी उपस्थित सर्वांनी उभे राहून या गाण्याला दाद दिली.

जाहिरात

यानंतर मन शुद्ध आहे तनबुद्ध आहे हे गीत गायले तर बदलापूर येथे चिमुकलीवर झाल्याच्या अत्याचाराच्या वेळी मला चीड नाही येत, यात माझा काय गुन्हा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा हे गीत गायल्यानंतर  सर्व उपस्थित आमच्या डोळ्यात पाणी आले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने माझी मैना गावावर राहिली ही फक्कड गायल्यानंतर टाळ्यांचा गजर झाला. तर मी वादळ वारा या गीताने अभूतपूर्व जल्लोष झाला. एकापाठोपाठ एक अत्यंत दर्जेदार झालेल्या सादरीकरणामुळे संपूर्ण माहोल समतेच्या गीतांमध्ये डुंबून गेला.

याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, जातीभेदाच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या देशांमध्ये जातीयतेचा वनवा पेटला आहे मात्र हा वनवा विझविण्याचे काम पुरोगामी विचार घेऊन डॉ.अनिरुद्ध वनकर करत आहे. राज्यपाल नियुक्त कलाकारांच्या कोट्यातून आमदार म्हणून त्यांची नियुक्ती काँग्रेस पक्षाने केली होती परंतु तत्कालीन राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे या कलाकाराची ही संधी हुकली मात्र जनतेच्या हृदयात त्यांचे मोठे स्थान आहे. हा देश व लोकशाही वाचवण्यासाठी हा पुरोगामी विचार वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर माजी आ डॉ.तांबे म्हणाले की, अंधश्रद्धा रूढी परंपरा जातीयवाद अशा अनिष्ट चालीरीतींवर डॉ अनिरुद्ध वनकर यांच्या गीतांमधून प्रबोधन होत आहे. खरे तर या विचारांची आता महाराष्ट्राला मोठी गरज असून सर्वांनी मानवतेचा धर्म वाढवावा.

प्रत्येक गाण्याला मिळणारी टाळ्यांची दाद उत्कृष्ट संगीत, लाईट डेकोरेशन भव्य दिव्य स्टेज बैठक व्यवस्था, आणि प्रेक्षकांचे उपस्थिती तसेच  अभिनेत्री कोमल धांडे, नेहा गाडे, ईश्वर खोब्रागडे ,अभिजीत बद्दलवार आणि कलाकारांची साथ यामुळे हा वादळ वारा विचारांचा कार्यक्रम संस्मरणीय आणि अभूतपूर्व ठरला. या कार्यक्रमाचे स्वागत डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले. याप्रसंगी संगमनेर मधील हजारो नागरिक ,महिला व युवकांची मोठी उपस्थिती होती.

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म वाढवावा – डॉ. थोरात.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज विविध संत व समाजसुधारकांचा वारसा आहे. समता व मानवतेचा मंत्र या सर्वांनी दिला आहे मात्र सध्या जाती भेदाचे होणारे राजकारण या अत्यंत दुर्दैवी असून सर्व तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र धर्म व मानवता धर्म वाढवण्यासाठी काम करावे असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले.

कबीरवाणी सह विविध गीतांनी स्रोते मंत्रमुग्ध

अंधश्रद्धेवर प्रहार करणारी कबीर वाणी, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, यांचा सादर झालेल्या विविध गीतांनी संगमनेर करांना मंत्रमुग्ध केले. अत्यंत भावनिक आणि दर्जेदार झालेला हा कार्यक्रम सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे