आपला जिल्हा

शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी संपन्न

शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी संपन्न

अंतीम तपासणी ११ मे रोजी

जाहिरात

शिर्डी प्रतिनिधी दि ८ मे २०२४खर्च निरीक्षक ममता सिंग यांच्या उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे पार पडली.

जाहिरात

या तपासणीस सर्व २० उमेदवारांपैकी काही उमेदवार स्वत: व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी निरीक्षक ममता सिंग यांनी स्वतः सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची काटेकोरपणे तपासणी केली. प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. अंतीम तपासणी ११ मे रोजी पार पडणार आहे. या तपासणीस सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवह्यांसह उपस्थित रहावे. उमेदवारांनी निवडणूकीसाठी उघडण्यात आलेल्या बँक खात्यामार्फतच खर्च करण्यात यावा. असे आवाहन खर्च निरीक्षक ममता सिंग यांनी केले आहे.

जाहिरात

या तपासणीला सहायक समन्वय अधिकारी (खर्च) बाबासाहेब घोरपडे व सचिन धस, सहायक खर्च निरीक्षक विवेक वर्मा, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे