आपला जिल्हा

शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचा साजरा होणार प्रथम वर्धापन दिन तर शुक्रभक्ताने दान केला चांदीचा महिरप

शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचा साजरा होणार प्रथम वर्धापन दिन तर शुक्रभक्ताने दान केला चांदीचा महिरप
शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचा साजरा होणार प्रथम वर्धापन दिन तर शुक्रभक्ताने दान केला चांदीचा महिरप
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ ऑगस्ट २०२५कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीकिनारी वसलेले जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पाहावा लागत नाही असे परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात शनिवार दि २३ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार असल्याची माहिती परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्टच्या वतीने दिली आहे.

जाहिरात

शनिवार ते २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता परम सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधिस्थान येथील परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज, आत्मा मालिक आश्रमातील परमपूज्य महंत परमानंदगिरीजी महाराज, श्री श्री १००८ महामंडलेश्वर शारदानंदगिरी माताजी, कुंभारी येथील परमपूज्य राघवेश्वरनंदगिरीजी महाराज आदि संत महंत यांच्या उपस्थितीत तसेच यजमान श्री व सौ प्रदीपशेठ धनराज राठी यांच्या शुभहस्ते मूर्तीची विधीवत  पूजा करत भव्य पालखी मिरवणूक व आरती संपन्न होऊन उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

जाहिरात
तसेच पवित्र श्रावण महिन्याच्या पर्वकाळात आज गुरुवार दि २१ ऑगस्ट रोजी एका दानशूर शुक्र भक्ताने महाराजांच्या मूर्तीस आकर्षक असा कोरीव नक्षीकाम केलेला सुंदर असा चांदीचा महिरप दान म्हणून दिला असून त्याची सुंदर अशी फिटिंग करणारे मुंबई येथील प्रसिद्ध कारागीर श्री मिथुन यांचा ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी बेट भागातील ग्रामस्थ,ट्रस्टी व शुक्रभक्त उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे