आपला जिल्हा

संजीवनी फार्मसीच्या ईरम अन्सारीच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

संजीवनी फार्मसीच्या ईरम अन्सारीच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल


संजीवनीतील संशोधनात्मक वातावरणाचे फलित

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२६-: संजीवनी एम.फार्मसीची विद्यार्थीनी ईरम तजमुलहक्क अन्सारी हिने ‘संजीवनी  अॅडवर्स ड्रग रिअॅक्शन रिपोर्टिंग सिस्टिम’ संबंधित चॅटबॉट आधारित प्रणाली या विषयावर संशोधनात्मक पोस्टर सादर केले. या पोस्टरच्या माध्यमातून तीला ‘अन्वेशन’ या आंतरराष्ट्रीय संशोधनात्मक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तीने तयार केलेल्या या प्रणालीचे कॉपीराईट नोंदणी केली असुन पेटंट प्रकाशन प्राप्त झाले.  भविष्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. संजीवनी फार्मसी मध्ये संशोधनपूरक वातावरण असल्याने येथील विद्यार्थी संशोधन क्षेत्रात उत्तम कामगीरी करीत आहेत.

जाहिरात

      ईरम अन्सारी हिने तयार केलेल्या पोस्टरला यापूर्वी महाविद्यालय, विभागीय, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय ‘अविष्कार’ पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश मिळाले. त्याचा परिणाम म्हणून तीला आता आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर आपले संशोधन मांडण्याची संधी मिळाली. संस्थेच्या दृष्टीने ही भुषणावह बाब आहे.  संजीवनी फार्मसी महाविद्यालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे.  विद्यार्थी व प्राध्यापकांना त्यामुळे संशोधन करणे सुकर होते. त्यांना संशोधन करण्याची प्रेरणा मिळते.

जाहिरात

    संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितीनदादा  कोल्हे यांनी ईरम अन्सारीचे अभिनंदन केले व तिच्या पुढील संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी  श्री अमित कोल्हे यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, तसेच या संशोधनासाठी मार्गदर्शन करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रमाणित केलेले प्रा. प्रदिप कराळे व समन्वयक डॉ. स्मिता कुंभार यांचे अभिनंदन केले. यावेळी  हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे उपस्थित होते.

जाहिरात

  संजीवनी एम.फार्मसीची विद्यार्थीनी ईरम अन्सारी हिने ‘संजीवनी अॅडवर्स ड्रग रिअॅक्शन रिपोर्टिंग सिस्टिम’ संबंधित चॅटबॉट आधारित प्रणाली या विषयावर संशोधनात्मक पोस्टर सादर केले. तिने विकसित केलेली हि प्रणाली वैद्यकीय आणि तसेच औषध निर्मीती क्षेत्राला उपयुक्त ठरेल. संजीवनीच्या विद्यार्थीनीच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. ही संस्थेच्या दृष्टीने अभिमान आणि गौरवाची बाब आहे. – अमित कोल्हे, कार्यकारी विश्वस्त , संजीवनी शैक्षणिक  संकुल  

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे