आपला जिल्हा

आईच्या स्मृती दिनी २० वर्षांपासून मोफत रुग्ण सेवा देणारे सरपंच डॉ विजय काळे

आईच्या स्मृती दिनी २० वर्षांपासून मोफत रुग्ण सेवा देणारे सरपंच डॉ विजय काळे
आईच्या स्मृती दिनी २० वर्षांपासून मोफत रुग्ण सेवा देणारे सरपंच डॉ विजय काळे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२५–  कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. विजय दादाहारी काळे हे गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे वैद्यकीय सेवा देत असुन ते १० वर्षाचे असताना त्यांचा वडिलांचे निधन झाल्यानंतर डॉ काळेच्या आई छबूबाई दादाहरी काळे यांनी काबाड कष्ट करत सर्व भावंडाना शिकवत स्वतःच्या पायावर उभे केले होते या कामी त्यांना डॉ काळे यांच्या आत्या कमल कदम व मावशी शोभा काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. २० वर्षांपूर्वी आईचे  निधन झाल्यानंतर डॉ काळे यांचे मोठे बंधू बाळासाहेब काळे, संजय काळे बहीण आकांक्षा वाघ या संपूर्ण काळे कुटूंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता या दुःखातून सावरत डॉ काळे यांनी आई च्या निधनानंतर  आपण देखील समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपल्या शिंगणापूर येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये आईच्या पुण्यतिथी दिनी दिवसभर येणाऱ्या सर्व रुग्णाची मोफत तपासणी करत आहे.

जाहिरात
या रुग्णसेवेच सेवेचे हे २० वे वर्षे असून बुधवार दि २४ सप्टेंबर रोजी आईच्या पुण्यतिथी दिनी साधारणपणे ६० पेक्षा अधिक रुग्णाची मोफत तपासणी करत आपल्या आई च्या आठवणीना उजाळा दिला आहे.डॉ विजय काळे हे शिंगणापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच असून त्यांना या उपक्रमास त्यांच्या पत्नी शिंगणापूर ग्रामपंचायत माजी सदस्या राजश्री काळे यांचे  मोलाचे सहकार्य असते.

जाहिरात

आई च्या पुण्यतिथी दिनी मोफत रुग्ण तपासणी या स्तुत्य उपक्रमाचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बीपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या सह ग्रामस्थ आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आदिनी कौतुक केले आहे तर या प्रसंगी त्यांचा मावशी शोभा काळे, आत्या कमल कदम,सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते तर  हे शिबीर यशस्वीतेसाठी  वैरागिनाथ मेडिकलचे दत्तात्रय चव्हाण, तुषार साळवे व राजू काळे यांनी अथक परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे