आपला जिल्हा

कोपरगावला परतीच्या पावसाचा तडाखा; तर पूर्व भागातील अनेक गावाचा संपर्क तुटला

कोपरगावला परतीच्या पावसाचा तडाखा; तर पूर्व भागातील अनेक गावाचा संपर्क तुटला

कोपरगावला परतीच्या पावसाचा तडाखा; तर पूर्व भागातील अनेक गावाचा संपर्क तुटला

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ सप्टेंबर २०२५सबंध राज्यभरात गेल्या काही दिवसापासून पावसाने हाहाकार उडवला असताना कोपरगाव तालुक्यात देखील शनिवार दि २७  सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरशः थैमान घालत संपूर्ण ओढे नाले तुडुंब भरत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे.

जाहिरात
शनिवार संध्याकाळ पासून जोराने बरसत असलेला पावसाने रविवारी सकाळपर्यंत सुरू राहत शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले मका, सोयाबीन, बाजरी, ऊस, भाजीपाला आदि पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून शासनाने त्वरित पंचनामा करत भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जाहिरात
 तसेच तालुक्यातील पूर्व भागातील नारंदी, डांबरा, कोळ नदी आदी ओढ्या नाल्याना पूर आल्याने  कोपरगाव वैजापूर हा मुख्य रस्ता तसेच करंजी, बोलकी, आंचलगाव, ओगदी, शिंगणापूर, खिर्डी गणेश, घोयेगाव, आपेगाव, शिरसगाव, तिळवणी, कासली, गोधेगाव, भोजडे आदी गावांतील छोट्या मोठ्या नाल्याना पूर आल्याने एकमेकांसोबत संपर्क तुटला होता तर  अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी रात्रभर असाच पाऊस सुरू राहिला तर या भागातील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होईल.
 शहरात अनेक भागात शिरले पाणी
 शहरातील खडकी भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे तर जुनी गंगा देवी परिसरात यात्रेनिमित्त थाटलेल्या दुकानदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे तर पुणतांबा फाटा परिसरात रस्त्यावर जणू तळ्याचे  स्वरूप आल्याने नगर मनमाड वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
 शहराला पुराचा धोका???
शहरातील गोदावरी नदीवरील मौंनगिरी सेतूवर पाणी आल्याने प्रशासनाने उपाययोजना सुरु करत परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे