आपला जिल्हा

तब्बल ४५ वर्षानंतर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा आनंदमिलाफ 

तब्बल ४५ वर्षानंतर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा आनंदमिलाफ 
तब्बल ४५ वर्षानंतर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांचा आनंदमिलाफ 
कोपरगाव विजय कापसे दि ५ नोव्हेंबर २०२५जळगाव जिल्ह्यातील शेंदूर्णी येथील  हरीप्रसाद महाराज होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या १९८० सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन मेळावा शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी कोपरगाव येथील अगत्य कृषी पर्यटन केंद्रात मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.

जाहिरात
तब्बल ४५ वर्षानंतर या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध शहरांमधून त्या बॅचचे आलेल्या महिला पुरुष डॉक्टरांचे स्वागत कोपरगावचे डॉ दिलीप जगताप व चंद्रमा जगताप यांनी प्रस्ताविक डॉ गंगाधर ढमाले यांनी करत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तर कार्यक्रमादरम्यान सर्व डॉक्टरांनी एकमेकांशी संवाद साधत कॉलेजमधील सुवर्णक्षणांच्या आठवणींना उजाळा दिला आणि जुन्या मित्रमंडळींसोबत एक दिवस आनंदात व्यतीत केला तर जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

जाहिरात
 या प्रसंगी विविध खेळ, स्पर्धा तसेच सुरेल गाण्यांच्या मैफिलींनी स्नेहमिलनाचा माहोल अधिकच रंगतदार बनला तर सर्व उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा स्नेहमिलनांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी भावना व्यक्त केली.

जाहिरात
या स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव येथील डॉ. जी. के. ढमाले, डॉ. दिलीप जगताप आणि डॉ. अशोक कुलकर्णी यांनी केले या बद्दल सर्वच उपस्थित डॉक्टर विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राजेश पिंगळे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ अशोक कुलकर्णी यांनी मानले.
या प्रसंगी डॉ लक्ष्मण विसपुते, डॉ दिनेश भंडारी,
डॉ राजेंद्र पिंगळे, डॉ पुष्पा पाटील, डॉ. अरुणा आग्रवाल, डॉ.मनिषा सुर्यवंशी, डॉ सतिष देवकर, डॉ.संजय चिंचोले, डॉ विवेक शिंदे, डॉ.अजय गर्जे, डॉ. माधुरी केला आदी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे