आपला जिल्हा
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

येवला विजय कापसे दि ११ एप्रिल २०२४– विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येवल्याचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून येवला येथील गुरुकुलात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९७ वी जयंती मोठ्या उत्साहात प्राचार्य तुषार कापसे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्राचार्य तुषार कापसे व गुरुकुलचे शिक्षकांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तर गुरुकुलच्या शिक्षिका सोनाली घोडके, सुजाता हेडगिरे,मनीषा कुमकर, भाग्यश्री खानापुरे,मनीषा शिंदे,वैशाली पवार,सुवर्णा काळे ,ऐश्वर्या कुकर,वैष्णवी शेलार ,पोर्णिमा वाघ,वर्षा गवळी ,कोमल जाधव आदींनी मनोगत व्यक्त करत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितली.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गुरुकुलचे प्राचार्य तुषार कापसे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आज आपण या ठिकाणी जे आहोत ते फक्त आणि फक्त महात्मा फुले यांच्यामुळेच.महात्मा फुले यांनीच सर्वांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली.त्यांनी आधी स्वतःच्या पत्नीला शिकवले व नंतर पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. हे सर्व कार्य करत असताना जनतेने त्यांना खूप त्रास दिला.तो सर्व त्रास सोसून त्यांनी हार न मानता समाजाचे कल्याण करण्यासाठी उभे राहिले. तळागाळातील समाज सुधारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.स्त्रियांना फक्त चूल आणि मूल हाच अधिकार नव्हे तर शिक्षणाचा देखील अधिकार आहे ही जनजागृती केली.त्यामुळेच आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत असल्याचे प्राचार्य कापसे यांनी सांगत महात्मा फुलेंना अभिवादन केले.



