आपला जिल्हा

डीएनए बारकोडिंग ही सजीवांची अचूक ओळख पटविणारी प्रभावी पद्धत” — डॉ. अमोल कल्याणकर

डीएनए बारकोडिंग ही सजीवांची अचूक ओळख पटविणारी प्रभावी पद्धत” — डॉ. अमोल कल्याणकर

डीएनए बारकोडिंग ही सजीवांची अचूक ओळख पटविणारी प्रभावी पद्धत” — डॉ. अमोल कल्याणकर

कोपरगाव विजय कापसे दि २५ फेब्रुवारी २०२६डीएनए बारकोडिंग ही सजीवांची अचूक व शास्त्रीय ओळख पटविणारी प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेत सजीवांच्या ऊतकनमुन्यातून डीएनए वेगळा करून विशिष्ट जनुक भागाची PCR तंत्राद्वारे वाढ केली जाते आणि त्यानंतर त्याचे अनुक्रमण (sequencing) केले जाते. प्राप्त अनुक्रम आंतरराष्ट्रीय डेटाबेसशी तुलना करून संबंधित प्रजातीची खात्रीशीर ओळख निश्चित केली जाते ”. असे प्रतिपादन ‘पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग आणि बायोडायव्हर्सिटी स्टडीज’ केंद्राचे समन्वयक डॉ. अमोल कल्याणकर यांनी केले. या कार्यशाळेचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.

जाहिरात

त्यांनी पुढे नमूद केले की, “प्राण्यांसाठी COI जनुक, तर वनस्पतींसाठी rbcL आणि  जनुकांचा वापर केला जातो. या तंत्रामुळे जैवविविधतेचे संवर्धन, नवीन प्रजातींचा शोध, अन्नभेसळ प्रतिबंध आणि वन्यजीव संरक्षण यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान मिळते”. ते  रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील प्राणिशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डीएनए बारकोडिंग’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते.

जाहिरात

श्री. शंकर मुटकुळे यांनी, “एआय लॅबमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना संगणकावर विविध सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मॉलिक्युलर डेटा अ‍ॅनालिसिस कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. त्यांनी डीएनए सिक्वेन्स डेटा संगणकात अपलोड करणे, त्याचे अलाईनमेंट करणे, त्रुटी तपासणी करणे तसेच फायलोजेनेटिक विश्लेषणासाठी आवश्यक टप्प्यांचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखविले”.

जाहिरात

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी डीएनए बारकोडिंग या तंत्रज्ञानाचे संशोधन क्षेत्रातील वाढते महत्त्व स्पष्ट करताना की, डीएनए बारकोडिंग ही सजीवांची अचूक व विश्वासार्ह ओळख पटविणारी आधुनिक वैज्ञानिक पद्धत असून जैवविविधतेच्या अभ्यासासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पारंपरिक वर्गीकरण पद्धतींसोबत जनुकीय विश्लेषणाची जोड मिळाल्यामुळे संशोधन अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ झाले आहे.”

जाहिरात

कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत प्राणीशास्त्र विभागप्रमुख  डॉ. विलास जीवतोडे यांनी केले, सदर कार्यशाळेसाठी नासिक, अ.नगर, छ.संभाजीनगर  जिल्ह्यातील  प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान,  औषधनिर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तर आभार प्रा. कु. अंकिता प्रसाद यांनी मानले. तर सूत्रसंचालन कु.  संस्कृती सरोदे हिने केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे