आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत वासुदेव शिंदे यांच्या अनवाणी पायात पुन्हा चप्पल

आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत वासुदेव शिंदे यांच्या अनवाणी पायात पुन्हा चप्पल
६ वर्षाच्या संकल्प पूर्ण

Kopargaon vijay kapse दि २१ मे २०२६–शिर्डीच्या साईबाबांच्या कृपेने २०२६ मध्ये विवेकभैय्या कोल्हे यांना विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि वासुदेव शिंदे यांचा सहा वर्षांचा संकल्प पूर्णत्वास गेला. यानिमित्ताने शिर्डीच्या पावन भूमीत त्यांनी आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत सहा वर्षापासून चप्पल त्याग केलेले वासुदेव शिंदे यांनी पुन्हा चप्पल घातली.२०१९ मध्ये मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला तेव्हापासून कोल्हे कुटुंबातील सदस्य आमदार होत नाही तोवर चप्पल घालणार नाही हा संकल्प वासुदेव शिंदे यांनी केला होता. त्यांनी पायात पुन्हा पादत्राणे घालून नवसपूर्तीचा अत्यंत भावनिक क्षण अनुभवला. नेता आणि कार्यकर्त्याचे अतूट नाते काय असते, याचेही यावेळी भावनिक दर्शन घडले.

आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे सहकारी वासुदेव शिंदे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर श्री साईबाबांच्या चरणी एक कठोर संकल्प केला होता. जोपर्यंत कोल्हे परिवारातील व्यक्ती आमदार होत नाही, तोपर्यंत पायात पादत्राणे घालणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. त्या संकल्पासाठी वासुदेव शिंदे यांनी तब्बल सहा वर्षे अनवाणी राहून आपली श्रद्धा आणि निष्ठा जपली.

महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर दिनांक 21 मे रोजी प्रथमच गुरुवारच्या पवित्र दिवशी युवानेते आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी रेणुकाताई कोल्हे यांच्या समवेत शिर्डी येथे उपस्थित राहून श्री साईबाबांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. शिर्डीत आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी संस्थानच्या वतीने आमदार कोल्हे यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना आमदार विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की,आज आमदार म्हणून बाबांच्या दरबारी उपस्थित राहताना मन अत्यंत भावूक झाले आहे. पुढील सहा वर्षांसाठी जनसेवेची संधी मिळाली असून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी ताकद, प्रेरणा आणि आशीर्वाद घेण्यासाठीच सपत्नीक शिर्डीत आलो आहे. श्री साईबाबांचा आशीर्वाद, जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे निस्वार्थ प्रेम हीच माझ्या सार्वजनिक जीवनातील खरी ताकद आहे. याच प्रेरणेने पुढील काळात जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प करीत आहे,असेही आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.
या प्रसंगी संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे, शिर्डी शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, गजानन शर्वेकर, सचिन शिंदे, सचिन तांबे, सचिन भणगे, चेतन कोते, रमेश शेळके, नरेश सुराणा, रमेश बिडये, राधाकिसन शेटे (मामा), गणेश जाधव, आकाश त्रिपाठी, सचिन वाघ आदी कार्यकर्त्यांची तसेच शिर्डीतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



